Published On : Tue, Jun 6th, 2023
By Nagpur Today Nagpur News

दीपस्तंभ संस्थेचा उपक्रम ; जयताळा घाट परिसरात वटवृक्षारोपन !

Advertisement

नागपूर : जागतिक पर्यावरण दिन जगभरात दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. पृथ्वीच्या संरक्षण, संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे. नागपूर शहरात हा दिवस साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जयताळा घाट परिसरात स्वछता व वटवृक्षारोपन करण्यात आले.

पंचतत्वांच संचालन करणाऱ्या अद्भुत शक्तीला यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुन्हा एकदा नमन करून, त्यांच्या स्वास्थ्यामध्येच आपले स्वास्थ सामावले आहे. हे मान्य करून दीपस्तंभ परीवाराच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण जयताळा घाट स्वछ करून पर्यावरण पुरक वटवृक्षाचे संपूर्ण घाट परिसरात रोपण केले.

Gold Rate
29 May 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver/Kg 98,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंचप्राणांसाठी पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज असल्याचे मत संस्थेच्या वतीने आयोजित उपक्रमात उपस्थित पाहुणे मंडळीनी व्यक्त केले.

संस्थेच्या उल्लेखनीय उपक्रमात कार्यकारी अध्यक्ष नंदकिशोर मानकर, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जयंत राव गुडधे पाटील, निवृत्त पोलिस अधिकारी रामेश्वर नितनवरे, प्रसिद्ध महीला उद्योजक छबूताई मडावी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य वर्षा मानकर, स्वामी समर्थ सेवा मंडळाचे विनोद मेहरे, योगा शिक्षक विनोद भेले, देवराव पांडे,हर्षित गुप्ता,अभय भांडारकर, रमेश सयाम, हरीकृष्ण धनविजय, ज्योती नाकतोडे, संगीता पानसे,सुमन भोसले,सरला राहांगडाले, प्रतिक्षा सयाम , गजानन मुंजे सहभागी झाले होते.

Advertisement
Advertisement
Advertisement