– कर्नाटक विधासभा निवडणुकीत काँग्रेसचे बहुमताचे सरकार आले आहे.
यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे कर्नाटकमधील वरिष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपसमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेतेमंडळीही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाने औपचारिकरीत्या सिद्धरामय्या यांची नेता म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला होता.
दरम्यान, आज बंगळुरुमधील कांतीरवा मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडला. सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार प्रियांक खर्गे यांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली.
सिद्धरामय्या, शिवकुमार आणि खर्गे यांच्याव्यतिरिक्त के. एच. मुनियप्पा, के. जे. जॉर्ज आणि एम. बी. पाटील या तीन नेत्यांनी नव-निर्वाचित कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच काँग्रेस आमदार जी. परमेश्वर यांनीदेखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.