नागपूर : रेल्वे बोर्डाने मंगळवारी नागपूर ते बिलासपूर दरम्यानची प्रतिष्ठित 14 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस आठ डब्यांची केली आहे. ही गाडी आजपासून नियमितपणे धावणार असल्याची माहिती समोर येत आहे.
14 मे रोजी नागपूर-बिलासपूर दरम्यानची वंदे भारत एक्स्प्रेस तात्पुरत्या स्वरूपात तेजस एक्स्प्रेसने रिप्लेस केली होती. मात्र, एका दिवसात पुन्हा तेजसची जागा वंदे भारतने घेतली आहे
एका रेल्वे अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, नवीन वंदे भारत. एक्स्प्रेसमध्ये आठ डब्बे असणार आहे. त्यात 450 प्रवासी बसू शकतील. प्रवाशांची आकडेवारी वाढली तर डबे पुन्हा वाढवले जातील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
तांत्रिक कारणांमुळे वंदे भारत एक्स्प्रेसला तेजस एक्स्प्रेसने रिप्लेस केले होते. मात्र, नागपूरकरांची गैरसोय होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना वारंवार माहिती देण्यात येणार आहे. रेल्वे यात्री संघाचे ब्रिजभूषण शुक्ला यांनी सांगितले की, ट्रेनची दिशा पूर्ववत करणे आवश्यक आहे. ही ट्रेन नागपूरहून सकाळी आणि बिलासपूरहून दुपारी चालवावी लागेल.











