Published On : Thu, Apr 27th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण, कर्करोगाच्या रुग्णांना मिळणार संजीवनी !

Advertisement

नागपूर : कर्करोग हा एक जीवघेणा आजार असून यावर रुग्णांना योग्य उपचार मिळाले यासाठी नागपुरात आज सर्वात मोठ्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या हस्ते रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) तसेच उद्योजक गौतम अदानी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपुरातील जामठा परिसरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून रुग्णालयात जवळपास 470 बेड आहेत. हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय असणार आहे.कर्करोगाच्या रुग्णांना संजीवनी देणारी संस्था म्हणून याकडे पाहण्यात येत आहे.
या रुग्णालयाच्या माध्यमातून विदर्भ आणि महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा अशा शेजारील राज्यातील लाखो कर्करोग (कॅन्सर) रुग्णांना उपचार घेता येणार आहे.

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान ट्रस्टतर्फे संचालित होणार आहे. डॉ. आबाजी थत्ते हे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यासोबत काम करणारे ज्येष्ठ स्वयंसेवक होते.

एनसीआयची स्थापन 2017 मध्ये 30 बेडच्या छोट्याशा रुग्णालयाच्या स्वरुपात धरमपेठ परिसरात झाली होती. आता या रुग्णालयायल मोठे करण्यात आले आहे. या रुग्णालयासाठी विविध कंपन्यांच्या सीएसआर फंड आणि समाजातून आलेल्या देणग्यांचा वापार घेण्यात आला.कॅन्सरच्या उपचारासाठी जागतिक दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असणाऱ्या या रुग्णालयात रुग्णांना परवडेल अशा दारात उपचार घेता येईल. तर लहान मुलांवर उपचाराची मोफत सुविधा असेल.

नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे महत्त्व खालीलप्रमाणे :
– या रुग्णालयात कर्करोगाच्या उपचारासाठी जागतिक दर्जाची वैद्यकीय सोय उपलब्ध होणार आहे.
– 470 बेडचे कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट युनिट
– 10 अद्ययावत ऑपरेशन थिएटर
– ओन्कॉलॉजी आयसीयू असलेले मध्य भारतातील एकमेव रुग्णालय म्हणून ओळख
– धर्मादाय पद्धतीने कार्य करणारे देशातील सर्वात मोठा कॅन्सर रुग्णालय
– लहान मुलांवर सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार देणारे मध्य भारतातील एकमेव रुग्णालय – लवकरच बोनमॅरो ट्रान्सप्लांट युनिट कार्यरत होणार
– कर्करोगाच्या उपचारातील नवीन न्युक्लियर मेडिसिन थेरेपी, आयोडिन थेरेपीसाठी वेगळे 10 बेड या रुग्णालयात असणार आहेत.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement