नागपूर : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) नागपूर आणि जवळपासच्या जिल्ह्यांसाठी 15 ते 17 एप्रिल या कालावधीत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अगोदच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आता पुन्हा त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
RMC च्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळे वेगळ्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. RMC ने यापूर्वी 15 ते 17 एप्रिल दरम्यान नागपूर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. नागपूर व्यतिरिक्त, आरएमसीने वर्धा, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांसाठीही ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.










