विरोधकांकडून केवळ कसबा-कसबा असा उच्चार केला जात असला तरी कॉंग्रेसचे उमेदवार सहानभूतीवर निवडून आले आहेत. त्याच दिवशी तीन राज्याचा निकाल आला असून त्यात भाजपाचा विजय झाला. विरोधक कितीही एकत्र आले तरी विजय भाजपाचाच होणार असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
शनिवारी ते कोराडी येथे माध्यमांशी संवाद साधत होते. श्री बावनकुळे म्हणाले, कसब्यातून यापूर्वी दोन वेळा धंगकरांनी निवडणूक लढविली असल्याने त्यांच्याबद्दल सहानभूती निर्माण झाली होती. येथे भाजपाची मते कमी झाली नाहीत. ब्राह्मण समाज कधीही देश देव, धर्म, संस्कृती सोडून विचार करत नाही. कसबा मध्येही ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही. मात्र जनतेचा कौल मान्य आहे. चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना भाजपाने ५१ टक्केची लढाई जिंकली व उमेदवार निवडून आला.
श्री बावनकुळे पुढे म्हणाले, शरद पवार साहेबांनी कदाचित देशातील ३ राज्याचे निकाल पाहिले नसावे. त्यांनी ते निकाल अगोदर पाहावे. संपूर्ण काँग्रेस साफ झाली आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रा केली. त्यानंतर हा काँग्रेसचा पराभव आहे. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघात प्रवास योजना सुरू आहे. अर्थसंक्लपीय अधिवेशन झाल्यावर नियमित प्रवास सुरू होतील. कितीही पक्ष एकत्र आले तरी येत्या काळात भाजपाच सर्व निवडणुका जिंकणार आहे.
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध यावेळी त्यांनी केला, कुठल्याही पक्षाच्या नेत्यला मारहाण करून दहशत निर्माण करणे योग्य नाही. गु्न्हेगारांचा शोध घेऊन गृहखाते योग्य तपास करून शिक्षा करेल असेही श्री बावनकुळे म्हणाले.
वीज नियामक मंडळाच्या सुनावणीत नेहमीच विरोध होतो. सरकार व नियामक मंडळ एकत्र बसून जनतेबर बोजा पडणार नाही असा निर्णय घेतली, अशी माहिती श्री बावनकुळे यांनी दिली.
कांदा उत्पादकांचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरल्याच्या प्रश्नावर श्री बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना नुकसान मदत करण्याचे फडणवीस-शिंदे यांनी जाहीर केले आहे. विरोधकांना जुने दिवस आठवत नाही. त्यांनी 20 रुपये नुकसान भरपाईचे चेक शेतकऱ्यांना दिले होते, असाही टोला त्यांनी लगावला.