Published On : Fri, Nov 11th, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.10) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 43 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नेहरुनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल नेहरुनगर झोन अंतर्गत आराधणा नगर, दिघोरी येथील सत्यम किराणा स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत कॅनल रोड, रामदासपेठ येथील जनाब अक्रम अंसारी यांच्याविरुध्द बेकायदेशीर टॅग NMC ऑन डयुटी त्यांच्या खाजगी वाहनावर चिपकविल्याबद्दल कारवाई करून 8 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पंचशिल चौक येथील जनाब मकबुल वाहाब अहमद यांच्याविरुध्द सार्वजनिक ठिकाणी बोर्ड/होर्डिंग्जचे प्रदर्शन लावल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच एलआयसी रोड, रामनगर येथील Orchid Diamond Builder यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत बहादुरा उमरेड रोड येथील रिलायन्स स्मार्ट पॉईंट यांच्याविरुध्द दुकानातील कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

आशिनगर झोन अंतर्गत महेन्द्रनगर येथील नागराज स्टिल्स यांच्याविरुध्द दुकानातील साहित्य टाकुण रस्त्यालगतची जागा गुंतविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Advertisement
Advertisement