Published On : Thu, Nov 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

‘पौर्णिमा दिवसा’निमित्त जरीपटका परिसरात जनजागृती

Advertisement

एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने बुधवारी (ता.९) जरीपटका येथील जिंजर मॉल आणि बाजूच्या परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली.

Gold Rate
02 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,51,200/-
Gold 22 KT ₹ 1,40,600 /-
Silver/Kg ₹ 2,62 600 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वीज बचतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शक माजी आमदार तथा माजी महापौर प्रा. अनिल सोले यांनी यावेळी स्वतः उपस्थित राहून नागरिकांना एक तासासाठी अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले व ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले.

जनजागृती उपक्रमादरम्यान ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.

माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात हे अभियान राबविण्यात येते. यावेळी ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, पार्थ जुमडे आदी स्वयंसेवकांनी परिसरात जनजागृती करीत व्यापारी व नागरिकांना त्यांच्या प्रतिष्ठान व घरातील वीज दिवे एक तासांकरिता बंद करण्याची विनंती केली. या मोहिमेत मनपाचे दिलीप वंजारी, हेमंत गौड, दत्तू सुर्यवंशी आदींनीही सहभाग नोंदविला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement