नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.9) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत शॉप नं.73A, धंतोली येथील सेवा सर्जिकल ॲण्ड ड्रग्ज यांच्याविरुध्द रस्त्यालगत क्लिनिकचा कचरा सामान्य कच-यासोबत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत प्लॉट नं.41, रामदासपेठ येथील R Sandesh Construction यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तसेच बजाज नगर, काचिपुरा रोड येथील Leafy Roof the Better Stores यांच्याविरुध्द दुकानातील कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत गणेशपेठ येथील DNR Travels यांच्याविरुध्द कार्यालयातील सामान्य कचरा मोठया प्रमाणात रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सतरंजीपूरा झोन अंतर्गत झेंडा चौक, इतवारी येथील Sahu Clinic यांच्याविरुध्द रस्त्यालगत क्लिनिकचा कचरा सामान्य कच-यासोबत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशिनगर झोन अंतर्गत जरिपटका येथील Capsline Pets Shop यांच्याविरुध्द दुकानातील कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.