नागपूर : रोशनी फाउंडेशन,महावितरण व माधव नेत्रपेढी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरणच्या सावनेर येथील कार्यालयात आयोजित नेत्रदान जागरूकता शिबिरात महावितरणच्या ४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे मुख्य पाहूणे माधव नेत्रालयाचे जनरल सेक्रेटरी डॉ. अग्नीहोत्री होते. सुरुवातीला रोशनी फाउंडेशन तर्फे राजेंद्रकुमार जैन यांनी मरणोपरान्त नेत्रदानाचा उद्देश व कार्य याबाबत माहिती दिली. सावनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता दिपाली माडेलवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान केले तर अंधत्व दूर करण्यात समाजाला मदत होईल,असे सांगून नेत्रदानाचे आवाहन केले.
या प्रसंगी महावितरणच्या ४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. तसेच ६५ कर्मचाऱ्यांची नेत्र चिकित्सा करण्यात आली.रोशनी फाउंडेशन तर्फे राजेन्द्र जैन, मानकर, दप्तरी, यादव लक्षणे, प्रभाकर दाणी,विनय टेकाडे, यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले.माधव नेत्रपेढी तर्फे अनिरुध्द सोमण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेत्र तपासणी केली. कार्यक्रमा चेसंचालन श्रीमती स्मिता नकाते व आभार प्रदर्शन अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयंत ठाकरे यांनी केले.