Published On : Mon, Sep 19th, 2022
By Nagpur Today Nagpur News

हजारावर नागरिकांशी ना. गडकरींनी साधला संवाद

नासुप्र, मनपा, राज्य, केंद्र शासनाशी संबंधित समस्यांचा पाऊस

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज जनसंपर्क कार्यक्रमात विविध समस्या घेऊन आलेल्या हजारावर नागरिकांशी संवाद साधला. नागिरकांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आजच्या जनसंपर्क कार्यक्रमांत समस्यांचा पाऊस पडला.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सकाळी 11 वाजेपासून सुरु झालेल्या या जनसंपर्कासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. समस्या घेऊन येणारा प्रत्येक जण ना. गडकरींना समस्यांची माहिती देत होते. यात महिला-पुरुषांचा समावेश होता. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांनीही ना. गडकरींची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली समस्या मांडली. याशिवाय काही शिष्टमंडळांनीही या जनसंपर्क कार्यक्रमात हजेरी लावून ना. गडकरींची भेट घेतली. जनसंपर्कासाठी आलेल्या सर्वांच्या तक्रारी एकून त्यावर विविध उपाययोजना करण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी संबंधितांना दिले. नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला.

या जनसंपर्क कार्यक्रमाला झोपडपट्टीतील गरीब माणसापासून उद्योगपतींपर्यंत सर्वच स्तरातील नागरिकांनी व महिलांनी तसेच विविध पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. नागरिकांची प्रचंड गर्दी असतानाही प्रत्येकाची भेट त्यांनी घेतली.

आजच्या या जनसंपर्क कार्यक्रमात महामार्ग, मनपा, नासुप्रच्या शहरातील रस्त्यांच्या समस्या, गडर लाईन, पाण्याच्या पाईपलाईन, स्वच्छता, नोकरी, अनुकंपा तत्त्वावरील नोकर्‍या, आरोग्य, पंतप्रधान आवास योजना, शाळा प्रवेश, संजय गांधी निराधार योजना, जिल्हाधिकारी कार्यालयासंबंधित विषयाच्या समस्या, व्यावसायिक महाविद्यालयांचे प्रवेश, प्रशासनिक बदल्या, मिहान प्रकल्प, दवाखान्यातील अव्यवस्था, नगर भूमापन विभाग, या समस्यांची निवेदने नागरिकांनी दिली. या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून शेकडोे नागरिकांची निवेदने जनसंपर्क कार्यालयाकडे जमा झाली आहेत.

Advertisement
Advertisement