Published On : Mon, Jul 18th, 2022
By Nagpur Today Nagpur News

बारा चाकी ट्रक च्या धडकेत दुचाकी चालकाचा मुत्यु तर मागे स्वार गंभीर जख्मी

कन्हान : – दोघे पेंटर शहापूर (अंगणवाडी) पवनी ता रामटेक ला पेंटीग चे काम करून मनसर वरून नागपूर कडे दुचाकीने येत असताना बंद टोल नाका वराडा शिवारात चारपदरी महामार्गावर बारा चाकी ट्रकने वळण घेऊन दुचाकीला धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक पवन ढोरे याचा दवाखान्या त नेताना मुत्यु झाला तर मागे स्वार भुषण बावणे जख्मी झाल्याने मेडीकल नागपुर येथे उपचार सुरू आहे. कन्हान पोलीसानी जख्मी भिषण बावने यांच्या बयाणा वरून ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवार (दि.१५) जुलै ला संकाळी ६.३० वाजता दरम्यान भुषण पुरूषोत्तम बावणे वय ३३ वर्षे राह. आयचित मंदीर कुनबी पुरा महल रोड नागपुर व मित्र पवन लक्ष्मणराव ढोरे वय २९ वर्षे राह. नाईक तलाव नागपुर हे दोघेही पेंटर असुन शहापुर (अंगणवा डी) पवनी ता. रामटेक ला पेंटीगचे काम करून मनसर वरून नागपुर कडे दुचाकी युनिकॉन मो.सा. क्र. एम एच – ३१ एफ के १८९९ ने डबलसिट येत असताना बंद टोल नाका वराडा शिवारातील राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वर बारा चाकी ट्रक क्र. ए पी – १६ – टी एफ – ९५४९ च्या बारा चाकी ट्रक चालकाने आपले वाहण यु टर्न घेत असताना भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चाल वुन दुचाकी ला डाव्या बाजुला धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकीसह रोडवर खाली पडल्या ने लोकानी रूग्णवाहीकेने उपचारासाठी पवन ला मेओ हॉस्पीटल नागपुर येथे भर्ती केले व भुषण ला डोक्या वर मार लागल्याने मेडीकल कॉलेज नागपुर ट्रामा वार्ड मध्ये भर्ती करून उपचार सुरू आहे.

Gold Rate
24 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,000 /-
Gold 22 KT ₹ 1,06,000 /-
Silver/Kg ₹ 1,35,700/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भुषण चा लहान भाउ राजु बावणे यानी सांगितले की, पवन ढोरे याचा उपचारा दरम्यान मेओ हॉस्पीटल येथे उपचारा दरम्यान मुत्यु झाला. कन्हान पोस्टे चे पोहवा जयलाल सहारे व विरेंद्र चौधरी यांनी मेडीकल नागपुर येथे पोहचुन गंभी र जख्मी भुषण बावने यांच्या तोंडी बयाणा वरून ट्रक चालका डी.नानी राह. आंध्रप्रदेश यांचे विरूध्द कलम २७९, ३३८, ३०४ अ, सह कलम १८४ मोवाका नुसार गुन्हा दाखल करून अटक केली व न्यायालयात हजर केले असता त्याला जामीनावर सोडण्यात आले. ही कार्यवाही कन्हान थानेदार पोनि विलास काळे यांचे मार्गदर्शनात पोहवा जयलाल सहारे व विरेंद्र चौधरी हे पुढील तपास करित आहे.

Advertisement
Advertisement