Published On : Wed, Jun 8th, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यावर कारवाई

Advertisement

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. 7) रोजी 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, नेहरुनगर, गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. धरमपेठ झोन अंतर्गत झिरो माईल्स, सिताबर्डी येथील हॉटेल गुलशन प्लाझा या दुकानाविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला.

नेहरुनगर झोन अंतर्गत रमणा मारोती येथील गायधने बंधु किराणा या दुकानांविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अंतर्गत टेलिफोन एक्सचेंज चौक येथील सोनु प्लास्टिक या दुकानांविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत तांडापेठ ठक्करग्राम, नंदगिरी रोड येथील रुपेश स्वीटस या दुकानाविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला.

Gold Rate
Feb 27th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,600/-
Gold 22 KT ₹ 1,49,400/-
Silver/Kg ₹ 2,71,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्याचप्रमाणे मंगलवारी झोन अंतर्गत कडबी चौक येथील नानक ग्रुप यांच्याविरुध्द दुकानाचा कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement