Published On : Tue, May 31st, 2022
By Nagpur Today Nagpur News

मनपा निवडणुकीसाठी महिला आरक्षण सोडत जाहिर

Advertisement

अनुसूचित जातीसाठी १६, अनुसूचित जमातीसाठी ६ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी १२ प्रभाग आरक्षित

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण मंगळवारी दि. 31 मे 2022 रोजी जाहिर करण्यात आले. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन, सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा उपस्थित होते.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रारंभी सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा यांनी शहराची लोकसंख्या, थेट महिला आरक्षित जागा आणि प्रभागाची सविस्तर माहिती सादर केली. १२ मे रोजी निवडणूक आयोगाद्वारे प्रभाग रचनेचे अंतिम प्रारूप मंजुर करण्यात आले. २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४,४७,४९४ ऐवढी आहे. यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ४८०७५९ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १८८४४४ एवढी आहे. नागपूर शहराची ५२ प्रभागामध्ये विभागणी करण्यात आली असून त्रिस्तरीय प्रभागरचना करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण सदस्यसंख्या १५६ असणार आहे. यापैकी ५० टक्के अर्थात ७८ जागा महिलांसाठी राखीव असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाद्वारे सर्वसाधारण महिलांकरिता ४४ जागा थेट नेमून दिलेल्या आहेत. अनुसूचित जातीकरिता एकूण ३१ जागा आरक्षित असून त्यातील १६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीकरीता १२ जागा राखीव असून त्यापैकी ६ जागा महिलांकरिता राखीव असून त्यांची सोडत मंगळवारी काढण्यात आली.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित ३१ प्रभागाच्या चिठ्ठ्यांमधून महिलांच्या १६ जागा काढण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक १ अ, २ अ, १० अ, १३ अ, १४ अ, १५ अ, १६ अ, २० अ, २७ अ, ३० अ, ३७ अ, ३८ अ, ३९ अ, ४३ अ, ४५ अ आणि ५२ अ असे अनुसूचित जाती महिलांचे प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले.

अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक ४ ब, १२ ब आणि ५१ ब या तीन प्रभागांची थेट निश्चित करण्यात आले. यानंतर उर्वरित ३ जागांसाठी अनुसूचित जमातीच्या उर्वरीत ९ जागामधुन ३ चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक २४ अ, ११ अ आणि ३७ ब चे अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले.

महिलांच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण १७ चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यापैकी १२ चिठ्ठ्या काढून त्यातून सर्वसाधारण माहितीकरीता १२ जागांचे आरक्षण जाहिर करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक ६ ब, १७ अ, २२ ब, २३ ब, २९ ब, ३१ ब, ३२ ब, ३५ ब, ४० ब, ४२ ब, ४८ ब आणि ४९ ब या १२ प्रभागांचे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले.

१ ते ६ जूनपर्यंत नोंदवा हरकती व सूचना
मंगळवारी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण जाहिर झाले. या आरक्षणाचे प्रारुप बुधवार १ जून रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. आरक्षणाबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना असल्यास त्या १ ते ६ जून या कालावधीत दुपारी ३ वाजतापर्यंत महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी यावेळी केले. आरक्षणाबाबत अंतिम अधिसूचना दि १३ जुन 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement