Published On : Sat, May 7th, 2022
By Nagpur Today Nagpur News

आनंदयात्री एकांकिका स्पर्धा ९ मे (सोमवार ) रोजी

Advertisement

स्थळ: साई सभागृह , शंकर नगर

नागपूर: आनंदयात्री -सोशल मीडिया फेसबुक वरील एक नवोदित मैत्री समूह…संपूर्ण देशभर पसरलेला . ह्या मैत्री समूहात प्रत्यक्षात बरेच जण अजून कोणी कोणाला भेटलेले नाही. सर्वांची सर्वच मैत्री हि फेसबुक वर.

Gold Rate
21 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,22,500 /-
Gold 22 KT ₹ 1,13,900 /-
Silver/Kg ₹ 1,53,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अश्या ह्या आनंद यात्री समूहाने संपूर्ण महाराष्ट्र ज्या काळात कोरोनाच्या विळख्यात होता आणि महाराष्ट्रातील मराठी नाट्य चळवळ मेटाकुटीला आलेली होती अशावेळी सर्व सदस्यासाठी एकांकिका स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.

फेसबूक इतिहासात प्रथमच आनंदयात्री फेसबुक गृपने आनंदयात्री एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. दहा केंद्र मिळून एकूण साठ एकांकिका होणार आहेत. त्यातून बारा फायनल ला निवडल्या जाणार आहेत.

विदर्भाच्या एकूण पाच एकांकिका ९ मे (सोमवार) रोजी साई सभागृहात, शंकर नगर येथे सकाळी १० वाजल्यापासून सुरु होणार आहेत.

त्यात नागपुर ची (क्षण) , वर्धा (सायलेंट स्क्रिम ) , भंडारा (व्यथा शेतकऱ्याची) , तुमसर (झिपऱ्या सुधारल्या ) , बुलढाणा (आम्ही भारतीय) ठिकाणावरुन वैदर्भीय कलाकार आपल्या एकांकिका सादर करणार आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी गुजराथ मधील बडोदा शहरापासून सुरु झालेली आहे आणि विदर्भ प्रांत प्राथमिक फेरी येत्या सोमवारी, ९ मे २०२२ ला नागपुरात आयोजित करण्यात आली आहे.

सर्व कलारसिकांना विनंती आहे कि त्यांनी विदर्भीय एकांकिकेचा आनंद प्रत्यक्ष साई सभागृह येथे येऊन घ्यावा .

Advertisement
Advertisement