Published On : Wed, Apr 20th, 2022
By Nagpur Today Nagpur News

पोलिसांच्या आशीर्वादाने कामठी च्या दुर्गा चौकात अवैध व्यवसाय जोमात

Advertisement

कामठी – नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराची 1990 -92 मध्ये झालेल्या जातीय दंगलामुळे महाराष्टाच्या गॅझेट मध्ये राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे अतिसंवेदनशील शहर म्हणून नोंद कारण्यात आली आहे तेव्हा कामठी शहरात गुन्हेगारीवर अंकुश लादून कायद्याचे राज्य निर्माण व्हावे या मुख्य उद्देशातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडंणविस यांच्या शुभ हस्ते कामठी पोलीस स्टेशन नागपूर परिमंडळच्या पाचव्या झोन मध्ये निर्माण करून शहर पोलीस आयुक्तालयात समावेश करीत मोठया गाजवाजाने 2014मध्ये शुभारंभ करण्यात आला असला तरी गुन्हेगारीचा ग्राफ पाहिजे तेवढा कमी झालेला दिसत नाही.दबंग म्हणून गाजलेले सी पी अमितेशकुमार व डीसीपी गजानन राजमाने यांच्या नावाने गुंडप्रवृत्तीच्या नागरिकांत चांगलीच दहशत माजली असून सी पी अमितेशकुमार व डीसीपी राजमाने यांच्या कारवाहिने सुज्ञ नागरिकांत मोठे कौतुक करण्यात येत आहे. मात्र काही वसुली बहाद्दूर पोलीस कर्मचारी आपल्या भ्रष्ट प्रवृत्तीतून अजूनही बाहेर पडले नाहोत ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.कामठी शहरात आजही अवैध धंदे बेभान सुरु असून जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुर्गा चौकात अवैधरित्या सट्टा व्यवसाय, जुगार, अवैध दारू विक्री सह ,इतर अवैध व्यवसाय सुरू आहेत ते फक्त जुनी कामठी पोलिसांच्या आशीर्वादाने.

कामठित अमली पदार्थाची बिनभोबाटपणे तस्करी सुरु आहे तर मागील वर्षी नागपूरच्या गुन्हे शाखा पोलिसांच्या अटकेत करण्यात आलेल्या कोकेंनतस्करकडून कामठी हे कोकेन व गर्द चे मोठे तस्कर असल्याचे कळले होते तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने कामठी शहरात गांजा व अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून बिनधास्त पणे गांजा विक्री सुरू आहे तर कामठी बस स्थानक चौक, इमलीबाग, गोल बाजार चौक, मच्चीपुल चौक, कादर झेंडा, इस्माईलपुरा, दुर्गा चौक यासारखे कीत्येक परिसर गांजा व अंमली पदार्थाची तस्करी केंद्र बनले असून पोलिसांना मिळत असलेल्या चिरी मिरी मुळे या अवैध व्यवसायिकांना पोलिसांचा अभयपणा झाला आहे

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सद्रक्षणाय खालनिग्रहनाय हे ब्रीद बाळगून जनसामान्यण्यासाठी सदैव तत्पर असणारे पोलिसावर शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची मुख्य जवाबदारी असते.मात्र काही भ्रष्ट पोलिसांमुळे या कर्तव्यदक्ष भूमिकेला गालबोट लागत असून शहरात काही प्रमाणात अवैध व्यावसायिकांचे जाळे पसरले आहेत .कामठी शहरात गांजा ची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून जागोजागी गांजा विक्री सुरू असून भरचौकात व बसस्थानक वा इतर ठिकाणी गांजा मद्यपी आढळून येतात पोलिसांच्या अशीर्वादामुळेच शहरात गांजा,चरस तसेच अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून यांना पोलिसांचा अभयपणा तयार झाला आहे तसेच कामठी शहरात कोकेंनतस्करासह गांजा व चरसविक्रीचे मोठे केंद्र असून याकडे पोलिसांनी अतिरिक्त कमाईकडे दुर्लक्ष पुरवून या अवैध धंद्यावर अंकुश लावावे अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.

-दुर्गा चौक परिसर हा बाजारपेठेतील परिसर असल्याने या ठिकाणी नागरिकांची वर्दळ सुरूच असते.या परिसरात जुनी कामठी पोलिसांच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे अवैध व्यवसाय सुरू आहेत ज्यामुळे कित्येक नागरिकांचे कुटुंब अस्तव्यस्त झाले आहेत तर अवैध व्यावसायिक पोलिसांना देत असलेल्या देणं मुळे गब्बर होत आहेत .तेव्हा या अवैध व्यवसायावर आळा न बसल्यास येथील काही जागरूक नागरिकांनी नाव न सांगण्याचा अटीवर पोलीस प्रशासना विरोधात आंदोलन करण्याचे सुद्धा बोलून दाखवले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement