Published On : Wed, Apr 20th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कामठी शहरात देशी पिस्टल ची वाढली क्रेझ

Advertisement

-कामठी तालुक्यात बुलेट राजाची वाढतेय दहशत
चाकूची जागा घेतली देशी कट्ट्याने


कामठी :-एकेकाळी शहरात गुन्हेगारी वर्तुळातील गुन्हेगार चाकू, तलवार यासारख्या शस्त्राचा वापर करून गुन्हे करीत होते.मात्र या शस्त्रांची जागा आता देशी कट्ट्याने घेतली असून कामठी शहरात देशी पिस्टलची क्रेझ वाढली आहे.

नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरात सन 1990-92 मध्ये झालेल्या जातोय दंगलीमुळे महाराष्ट्राच्या गॅझेट मध्ये महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे अतिसंवेदनशील शहर म्हणून कामठी शहराची नोंद आहे .या शहरात विविध धर्मीय नागरिक वास्तव्यास असून तालुकादर्जा प्राप्त कामठी शहरात आणीबाणीची स्थिती ही केव्हाही निर्माण होत होती तेव्हा अपुऱ्या पडणाऱ्या मनुष्यबळामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत औचित्याचा मुद्दा निर्माण होत असल्याने शहराची द्रुतगतीने वाढणारी संवेदनशीलता लक्षात घेता येथील पोलीस स्टेशन चा कारभार हा शहर पोलीस आयुक्तालयाशी जोडण्यात आला तेव्हा शहराची गुन्हेगारी कमी होणार व पोलिसांचा वचक बसणार असे अपेक्षित असले तरी गुन्हेगारांवर पोलिसांचा पाहिजे तसा वचक दिसून येत नसून उलट गुन्हेगारिवृत्ती च्या लोकांच्या हाती असलेल्या चाकू अवजारे नि आता अवैधरीत्या देशी कट्ट्याने तसेच माऊझर ने घेतली आहे ज्यामुळे शहरातील गल्लीबोळातील चिरकूट गुंडामध्येही पिस्तुल वापरण्याचे आकर्षण वाढले असून या गुंड्याकडे देशी कट्टा वापरण्याचे ‘फॅड’झाले आहे .परिणामी कामठीत बुलेट राजा चि दहशत वाढीवर आली आहे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मागील काही वर्षा च्या कालावधीचा विचार केला असता स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे स्टेशन चौकातून एक देशी पिस्टल ,मॅगझिनसह आरोपीस अटक करण्याची कारवाही राष्ट्रपितामहात्मा गांधी जयंतीदिनी

2 ऑक्टोबर ला करण्यात आलो होतो त्याच्या तीन महिन्याआधी कमसरी बाजार परिसरात एक देशि पिस्टल सह आरोपीस अटक करोत तस्करीवर आळा घालण्यात आला होता तसेच मध्यप्रदेशात गोळीबार करोत एकाची हत्या करून पसार झालेल्या कुख्यात गुन्हेगारासह तीन आरोपीना अटक करीत देशी बनावटीच्या चार बंदुका गुन्हेशाखा पोलिसांनी जप्त केल्या होत्या ज्यामध्ये दोन आरोपीना अटक करीत त्यांच्याकडून देशिकट्टे जप्त करण्यात आले होते.

शहरातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी स्थानिक काही भ्रष्ट पोलिसांचे सुमधुर संबंध असल्याने एकीकडे पोलिसांचा वचक कमी होत चालला असून लहानसहान गुंडाकडे सुद्धा पिस्तुल व देशिकट्टे आढळत आहेत तसेच शहरात देशिकट्ट्याच्या तस्करीला वेग आला असून 10 ते 50 हजार रुपया पर्यंत सर्वसाधारण रित्या देशिकट्ट्याचो तस्करी केली जाते वास्तविकता पोलिसांना सगळेच माहिती असते त्यांचे पंटर त्यांना पुरेपूर पूर्ण माहिती देतात मात्र यामध्ये उलट काही भ्रष्ट पोलीस कर्मचारी चिरीमिरी घेऊन उलट या धंद्याला शह देतात यामध्ये पोलिसांचे दुर्लक्षित धोरण आणि पिस्तुल तस्करी ला वेग आल्याने शहरात देशीकट्ट्याची दहशत वाढीवर असल्याच्या चर्चेला उधाण आहे.

गावठी कट्टे मध्यप्रदेशातून केवळ 10 ते 15 हजार रुपयांना आणले जातात .काही देशी कट्टे गावठी स्वरूपात असले तरी आता काळानुसार त्याच्या बनावटीमध्ये सुधारणा होत चालली आहे. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, बिहार येथून कमी पैशात अवैध पिस्तुल विक्री होत दिसुन येत असून ही टोळी कामठी शहरातही अवैध घोडा विक्री करीत असल्याची चर्चा असून शहरात कित्येक गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडे मोठ्या संख्येत देशी कट्टे असल्याचीही चर्चा ऐकिवात येते.मागिल काही वर्षांपूर्वी तत्कालीन डीसीपी अविनाश कुमार यादव यांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून शहरातील दिग्गज लोकांच्या घरी धाडी घालून झडती घेतली होती यावेळी काहींना शंकेच्या भोवऱ्यात अडकविण्यात सुद्धा आले होते.नवीन कामठी व जुनी कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येनाऱ्या हद्दीत अंगरक्षणासाठी वापरण्यात येणारे शस्त्र पिस्टल साठी 80 च्या वर नागरिकांकडे परवाने असून त्यांच्याकडे पिस्टल आहेत ज्यामध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह काही माजी सैनिकांचा समावेश आहे.यातील कित्येकांनी परवाने नूतनीकरण केले नसल्याची माहिती आहे.

सध्याची धार्मिक संवेदनशीलता लक्षात घेता शहरात दूषित राजकारणाला वेग येत आहे तेव्हा तालुक्यात राजकीय परिस्थितीत बिघडल्याने संवेदन शिल स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा पोलिसांनी वेळीच दक्षता घेने गरजेचे असून अवैधरित्या शस्त्र तसेच देशिकट्ट्या बाळगणाऱ्यांना कायद्याचा बडगा देणे अति गरजेचे असले तरी पोलीस विभाग च्या दुर्लक्षित तसेच कामकाढु धोरणामुळे शहरात बुलेट राजाची दहशत ही वाढीवर आहे.

बॉक्स—मागील वर्षी जानेवारी 2021 ला नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभारे कॉलोनी हद्दीतील एका अवैध दारू विक्रेता महिलेच्या घरातून 10 हजार रुपये किमतीचा देशी कट्टा जप्त करण्यात आला होता तसेच यावर्षी च्या फेब्रुवारी महिन्यात कामठी तालुक्यातील आवंढी गावात गोळीबार करून दरोडा टाकण्यात आला होता यासारख्या कित्येक घटना घडल्या आहेत

Advertisement
Advertisement
Advertisement