जिल्हाधिकारी यांचे हस्ते शिबिरात आदीवासी नागरिकांना शिधापत्रिका वाटप
रामटेक – जिल्हाधिकारी आर.विमला यांच्या मार्गदर्शनाखाली ,मौजे लोधा, तहसील रामटेक येथे महाराजस्व अभियान सन 2021-22अंतर्गत विस्तारित समाधान योजनेचे शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर शिबिराला जिल्हा परिषद सदस्या शांताताई कुमरे ,जिल्हाधिकारी आर. विमला मा.उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते ,तहसीलदार बाळासाहेब मस्के , अप्पर तहसीलदार रामटेक, गटविकास अधिकारी रामटेक,तालुका कृषी अधिकारी रामटेक,तालुका आरोग्य अधिकारी रामटेक,प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र रामटेक,अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देवालापार,,पंचायत समिती उपसभापती रवी कुंभरे, सरपंच लोधा तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
तसेच सदर शिबिरात विविध विभागामार्फत सदर आदीवासी नागरिकांना शिधापत्रिका वाटप,वनहक्क पट्टे वाटप,विविध सेतुविषयक दाखले,प्रधानमंत्री घरकुल योजना मंजुरी आदेश इ.सेवांचे मा.जिल्हाधिकारी महोदया यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.