Published On : Wed, Feb 9th, 2022
By Nagpur Today Nagpur News

हिंगणघाट जळीतकांडः आरोपी विकेश नगराळे दोषी; आरोपीला शिक्षा सुनावणार

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश नगराळेला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी उद्या कोर्टात सुनावणी असून विकेश नगराळेला शिक्षा जाहीर होण्याची शक्यता आहे.

हिंगणघाटपासून १५ किलोमीटर अंतरावरील दरोडा येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेनंतर समाजमन संतप्त होऊन रस्त्यावर आले होते. मोर्चे, आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला होता. हिंगणघाट जळीतकांडाचा आज निकाल जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाने आज विकेश नगराळेला दोषी ठरवत उद्या शिक्षा जाहीर होणार आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणात पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कार्यालयीन कामकाजच्या केवळ १९ दिवसातच ४२६ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात एकूण ६४ सुनावणी घेत २९ साक्षीदरांचे प्रत्यक्ष जबाब नोंदविण्यात आले आहे. घटनेला दोन वर्षे झाली असून पीडितेच्या मृत्यूला १० फेब्रुवारी रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळं पीडितेच्या स्मृतीदिनाच्या दिवशीच आरोपीला शिक्षा सुनावणार असल्याची दाट शक्यता आहे. तसंच, न्यायालय आरोपीला काय शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

काय घडले होते.

पीडिता हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. यामध्ये पीडिता ३ फेब्रुवारीला २०२० ला सकाळी तिच्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. पीडिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील काढलेले पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवले. यात गंभीररित्या जळालेल्या पीडितीचा नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता

Advertisement
Advertisement