Published On : Thu, Nov 11th, 2021
By Nagpur Today Nagpur News

नवाब मलिक राजीनामा द्या : भाजयुमोची मागणी.

Advertisement

नवाब मलिकांचा पुतळा फुंकला..!

आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर शहराच्या वतीने गणेशपेठ बस स्टॅंड चौक येथे नवाब मलिक यांच्या विरोधात अंडरवल्ड सोबत संबध असेलेल्या मुंबईच्या मारेकऱ्यांसोबत मिळुन गैर व्यवहार केल्या प्रकरणाचा तीव्र निषेध नवाब मलिकांचा पुतळा फुंकुन तीव्र निषेध व्यक्त केला.

Gold Rate
21 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,22,500 /-
Gold 22 KT ₹ 1,13,900 /-
Silver/Kg ₹ 1,53,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नवाब मलिकांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन विकत घेतल्याच्या निषेधार्थ भाजयुमो हे आंदोलन होते.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध, मलिक यांनी देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिधी काल समोर आणले आहेत होते.

१९९३ बॉम्बस्फोटातील दोषी असलेला सरदार शाह वली खान व सलीम पटेल याच्या सोबत असलेले नवाब मलिक यांचे व्यावाहारीक संबंध देशद्रोह्या सोबत संबंध असल्यामुळे या निषेधार्थ आज युवा मोर्चाने आक्रामक आंदोलन केले.


आंदोलन भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या नेतृत्वात झाले. यावेळी भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, प्रदेश सदस्य रितेश राहाटे, महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्क मंत्री मनिष मेश्राम, मंडळ अध्यक्ष अमर धरमारे, यश सातपुते,बादल राऊत,सनी राऊत,संकेत कुकडे, गौरव हरडे, एजाज शेख, पिंटू पटेल, गुड्डू पांडे, आशिष मेहर, गोविंदा काटेकर,घनश्याम ढाले,ईशान जैन,राहुल ताकवत,सागर घाटोले,अक्षय शर्मा, राहुल सावड़ीया,आशिष तिवारी,आकाश भेदे, अथर्व त्रिवेदी,पवन महाकाळकर, हरीश निमजे,अक्षय ठवकर, रितेश पांडे,सचिन पौणिकर,अनुप साळवे, अनुप खोब्रागडे, समीर मांडले,राकेश भोयर,आशुतोष भगत व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement