Published On : Thu, Aug 26th, 2021
By Nagpur Today Nagpur News

काटोल-नरखेड क्षेत्रातील रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर..! – डॉ. आशिष देशमुख

Advertisement

● काटोल-नरखेड तालुक्यात नि:शुल्क रोगनिदान, रूग्णभरती व रक्तदान शिबिरांचे आयोजन.
●भिष्णूर येथे ४२५ रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ.

“ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवेचा लाभ मिळून त्यांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून काटोल-नरखेड क्षेत्रात नि:शुल्क रोगनिदान व रुग्णभरती शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूरच्या माध्यमातून ‘डॉक्टर आपल्या दारी’ आणून रुग्णांना मदतीचा हात देण्याचा आपला प्रयत्न आहे. अशी शिबिरे आपल्या भागात या आधीसुद्धा आयोजित केलेली होती. या रुग्णालयातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांचा फायदा ग्रामीण भागातील लोकांनासुद्धा व्हायला पाहिजे, हे सुध्दा या शिबिराचे एक उद्दिष्ट आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत निःशुल्क हृदय उपचार व हृदय शस्त्रक्रियासुद्धा लता मंगेशकर हॉस्पिटल, सीताबर्डी येथे करण्यात येणार आहे.

Gold Rate
05 May 2025
Gold 24 KT 93,900/-
Gold 22 KT 87,300/-
Silver/Kg 95,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सर्वात खर्चिक असलेल्या दंत विकारांसाठी आपल्या दंत महाविद्यालयाची दंत उपचार बससुद्धा रुग्णसेवेची आलेली आहे. आजकाल डेंग्यूचे मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. डेंग्यूचा फैलाव थांबविणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात रक्तदान करून गरजूंना मदत करावी. ज्यावेळी कोरोनाच्या गंभीर समस्येमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते, त्यावेळीसुद्धा काटोल-नरखेड क्षेत्रातील कोविडग्रस्त रुग्णांना लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून नि:शुल्क सेवा प्रदान करण्यात आली होती, हे सर्वांना माहीत आहेच. कोरोनाच्या तिसऱ्या संभावित लाटेचा धोका बघता, प्रत्येकाने सोशल डिस्टन्स ठेऊन मास्कचा वापर करावा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. काटोल-नरखेड क्षेत्रातील रुग्णांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर आहोत”, असे प्रतिपादन काटोल-नरखेडचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले. भिष्णूर येथील सांस्कृतिक भवन येथे त्यांनी आयोजित केलेल्या ‘नि:शुल्क रोगनिदान, रुग्णभरती व रक्तदान शिबिराच्या’ उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

या शिबिरात ४२५ रुग्णांनी आपली तपासणी करून औषधोपचार करून घेतले. यावेळी शिबिरात नि:शुल्क औषध वितरणसुद्धा करण्यात आले. पुढील निःशुल्क उपचार व नि:शुल्क ऑपरेशनसाठी गरजू रुग्णांना लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे. शिबिरात उत्साही रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सर्व शिबिरार्थींना मास्कचे वाटप करण्यात आले.

लोकनेते मा.श्री. रणजितबाबू देशमुख यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काटोलचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या वतीने काटोल व नरखेड तालुक्यात २१ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर’२१ पर्यंत ‘नि:शुल्क रोगनिदान, रूग्ण भरती व रक्तदान शिबिरांचे’ आयोजन करण्यात आले आहे. या निःशुल्क शिबिरांत लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूरच्या जनरल मेडिसीन, शल्य-चिकित्सा, बालरोग, अस्थिरोग, प्रसुती/स्त्रीरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, छातीरोग, दंतरोग व चर्मरोगांसहित इतर सर्व रोगांच्या रुग्णांची विशेषज्ञद्वारा निःशुल्क तपासणी व मार्गदर्शन करण्यात येत आहे. पुढील उपचारासाठी रुग्णांना लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर येथील जनरल वॉर्डमध्ये भरती केल्यास त्या रुग्णांना १००% निःशुल्क उपचार व १००% निःशुल्क ऑपरेशनचा लाभ मिळेल. एमआरआय, सिटी स्कॅन तसेच इतर सर्व तपासण्यासुद्धा निःशुल्क करण्यात येतील. फक्त औषधी व बाहेरील साहित्यांचाच खर्च रुग्णाला करावा लागणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लता मंगेशकर हॉस्पीटल, सीताबर्डी, नागपूर येथे निःशुल्क हृदयविकार उपचार, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी व हार्ट ऑपरेशन करण्यात येईल.

पुढील ‘रोगनिदान, रुग्णभरती व रक्तदान शिबीर’ शनिवार दि. २८ ऑगस्ट २०२१ ला जि.प.प्राथमिक शाळा, लाडगांव येथे सकाळी १० ते २ पर्यंत संपन्न होईल.

Advertisement
Advertisement