Published On : Mon, Aug 23rd, 2021
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बांधली वाहतूक पोलिसांना राखी

Advertisement

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने वाहतूक पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून दरवर्षी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदा रविवार, दिनांक 22 ऑगस्ट रोजी वाहतूक नियंत्रण शाखा येथे पार पडला. यावेळी पोलीस बांधवांना महापौर राखी संजय कंचर्लावार, माजी महापौर अंजली घोटेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती चंद्रकला सोयाम, झोन एकच्या सभापती छबूताई वैरागडे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती पुष्पा उराडे यांच्यासह महिला नगरसेविका सौ. अनुराधा हजारे, सौ. कल्पना बगुलकर, सौ. माया उईके, सौ. शितल गुरनुले, सौ. जयश्री जुमडे, सौ. आशा आबोजवार, सौ. वंदना तिखे, सौ. शीला चव्हाण, सौ. वंदना जांभूळकर, सौ. वनिता डुकरे, सौ. मंगला आखरे, मनपाचे समाज कल्याण अधिकारी सचिन माकोडे, रोशनी तपासे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बहीणभावाच्या मनातील प्रेम भावना जपणारा हा राखी पौर्णिमेचा उत्सव आहे. कोरोना काळात आपण जे कार्य करत आहेत, त्याची परतफेड करता येणार नाही, परंतु या बहिणींच्या रक्षाबंधनाने आपले कर्तव्य बजाविण्यात नक्कीच अधिक बळ मिळेल, म्हणून मनपा महिला व बालकल्याण समितीने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

Advertisement
Advertisement