Published On : Fri, Aug 6th, 2021
By Nagpur Today Nagpur News

पालकमंत्र्यांनी नागपूरमधील समस्या लवकर दूर कराव्यात अन्यथा त्यांच्या घरात साप सोडण्यात येईल-रिपब्लिकन सेना

Advertisement

नागपुर – रिपब्लिकन सेना तर्फे अनेक दा खालील समस्या बाबत मनपाला निवेदन दिलेत परंतु कोणतीही समस्या पूर्णपणे दूर झालेली नाही मनपा अधिकारी आयुक्त पालकमंत्री यांचे नाव सांगून हात झटकत असतात म्हणून शेवट चे अल्टीमेटम म्हणुन आज स्मरण म्हणून रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत उपस्थित नसल्या मुळे त्यांचे एचओडी भुसारी यांनी तसेच मनपा अति आयुक्त राम जोशी यांना निवेदन देण्यात आले,आणि निवेदनाच्या माध्यमातून उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राच्या तसेच नागपूर शहरातील विविध क्षेत्रातील समस्याबाबत त्यांना अवगत करण्यात आले,

ज्यामध्ये प्रभाग क्रमांक दोन मधील दीपक नगर ही वस्ती मागील 25 वर्षापासून बसलेली आहे तरी या वस्तीमध्ये अद्यापही मध्ये गडर लाईन,सिवर लाईन,पिण्याची पाईप लाईन व पक्के रस्ते नाहीत या लोकांनी विकास शुल्क करीता 1000 रु सुद्धा नासूप्र कडे भरलेले असून सुद्धा अनदेखी केली जात आहे नारी रोड ते मैत्री कॉलोनी दीपक नगर ला जाणारा मेन रस्ता जड वाहणामुळे पूर्णपणे तुटलेला आहे त्यामुळे काशी नगर, दीपक नगर, मैत्री कॉलोनी करीता जाण्यासाठी रस्ता च नाही त्याच प्रमाणे नारी रोड म्हाडा कॉलोणी ते गुरुनानक कॉलेज ला जाणारा रस्ता सुद्धा खराब झालेला आहे त्यामुळे या दोन्ही मुख्य रस्त्यावर पाणी साचलेले असल्यामुळे लोकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ततसेच बाबा दीप सिंग नगर मध्ये सीवर लाईन व पक्के रस्ते नाहीत आणि नारी रोड ते राजगृहनगर ते गुरुद्वारा चौक पर्यंत रस्ताच नाही आणि याच परिसरामध्ये काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सुद्धा नाही, त्याचप्रमाणे प्रभाग 2 मधील शेंडे नगर समता शाळेचे लाईन या परिसरात शिवर लाईनआणि गडर लाईन खराब असल्यामुळे लोकांच्या घरात तसेच रस्त्यावर सतत घाण पाणी वाहत असते तसेच मानव नगर या परिसरात सुद्धा याच समस्या अनेक वर्षापासून आहेत.प्रभाग क्रमांक पाच मधील संजय गांधीनगर मध्ये काही दिवसा पासून नाल्याची भिंत कोसळलेली आहे या भिंतीच्या काठावरलहान मुलांची बालवाडी, बुद्धविहार तसेच अनेक लोकांची घरं आहेत त्या कोसळलेल्या भिंतीमुळे वस्तीमध्ये विषारी साप, विंचू तसेच घातक प्राणी शिरतात आणि नाल्याची दुर्गंध येत असते म्हणून या वस्तीमध्ये मलेरिया टायफाईड व डेंगू चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

त्याचाप्रमाणे प्रभाग क्रमांक सहा मधील महेंद्र नगर खंते नगर या परिसरात गडर लाईन व पिण्याच्या पाण्याची लाईन सोबत सोबत आहे व सीवर लाईन सुद्धा खूप जुनी असल्यामुळे अनेक ठिकाणी तुटलेली आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच गटाराचे पाणी सुद्धा येत असते आणि या सर्व समस्यांमुळे या वस्तीत सुद्धा डेंगू, मलेरिया, टाइफाइड सारखे आजार नेहमी येत असतात व अनेक लोक आजारी सुद्धा पडतात.

त्याच प्रमाणे कामठी रोड ते बाबा बुड्डाजी नगर पंचशील नगर ते वैशाली नगर मेन रोड ला जाणारा रोड हा अर्धवट असल्यामुळे शाळेकरी मुलांना व जनतेला फिरून जावं लागत त्यामुळे खूप त्रास होत आहे, त्याचप्रमाणे फारुख नगर मधील नासूप्र ने तयार केलेल्या फुटबॉल ग्राउंड वर उर्दू शाळेच्या बाजूला रात्री मध्यरात्री असामाजिक तत्त्वाचे लोक येऊनगोळा होतात सर्वसामान्य जनतेला त्रास देतात तसेच सुटलेल्या फुटपाथवर अनेक लोकांनी अतिक्रमण करून घेतल्यामुळे जाण्याचा त्रास होतो,

प्रभाग क्रमांक 1 मधील सुगत नगर म्हाडा कॉलनी 531 परिसरात गटर लाईन व सीवर लाईन जुन्या व लहान असल्यामुळे बरोबर सफाई होत नसल्यामुळे ती गटरची घाण लोकांच्या घरांमध्ये तसेच रस्त्यावर वाहत असते,

तसेच प्रभाग क्रमांक तीन मधील पवन नगर, संघर्ष नगर, यशोधरा नगर, योगी अरविंद नगर या परिसरात रस्ते व गडर लाईन पूर्णता तुटलेली आहे त्याचप्रमाणे संघाराम बुद्धविहारा जवळील रोड तुटल्यामुळे संपूर्ण पाणी रस्त्यावर साचलेले असते त्यामुळे लोकांना येण्या-जाण्याचा खूप मोठा त्रास होत आहे ,
तसेच प्रभाग क्रमांक 36 मधील काशिनगर रामेश्वरी हा परिसर खूप जुना आहे आणि या परिसरातील गटर लाईन तसेच सीवर लाईन जुनी असल्यामुळे पूर्णता तुटलेली आहे त्यामुळे अनेकांच्या घरात व रस्त्यावर गटर चे घाण पाणी वाहत असते,

तसेच प्रभाग क्रमांक 35 मधील जोगी नगर या परिसरातील गटर लाईन तसेच शिवर लाईन पूर्णतः तुटलेली आहे आणि रस्त्यांचे सुद्धा तेच हाल आहेत त्यामुळे या वस्तीत पावसात पाणी साचलेले असते,

या सर्व समस्या बाबत निवेदन नितीन राऊत हे नागपूर चे पालकमंत्री होन्याच्या नात्याने त्यांना देण्यात देण्यात आले व वरील समस्या 2 महिन्यात दूर करण्यात याव्या दूर करण्यात याव्या अन्यथा रिपब्लिकन सेना तर्फे पालकमंत्री यांच्या घरात वस्तीत येणारे विषारी साप सोडण्यात येईल..

व वस्त्यामधील संपूर्ण घाणेरडी घाण मनपा कार्यालयात सेना तर्फे टाकण्यात येईल.

निवेदन देते वेळी भूषण भस्मे, धर्मपाल वंजारी, राजकुमार तांडेकर, मनीश रंगारी, सुरेंद्र मस्के, नरेंद्र तिरपुडे, सचिन अन्वीकर, संजय सुखदेवे, शरद दंढाळे, विकास मुन, रमेश बनसोड, अरविंद कारेमोरे,नीलेश सरसान, रविकांत देशपांडे, एम रामगडिया, अश्विन हाटे, महेंद्र उके, मिलिंद घरडे, मिलिंद बोरकर, सिद्धार्थ पिल्लेवाण डोडमा सोबत सोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement