Published On : Mon, Jun 7th, 2021

चंद्रपूर शहरात ६० हजार ८५९ नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

Advertisement

२१ हजार २२८ जणांचा दुसरा डोस पूर्ण
१८ ते ४४ वर्ष वयोगटातील ४५३३ जणांना पहिला डोस

चंद्रपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीना पहिली तर, फ्रंटलाईन वर्करसह ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना पहिली व दुसरी लस देण्यात आली. ७ जूनअखेरपर्यंत एकूण ८२ हजार ८७ जणांनी लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली. यात ६० हजार ८५९ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार २१ हजार २२८ पात्र लाभार्थ्यांना दुसरा डोस देखील देण्यात आला आहे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. प्रारंभी आरोग्य सेवेतील व्यक्तींना मात्रा देण्यात आली. त्यात ८ हजार ११८ आरोग्य सेवकांना पहिला डोस, तर ४ हजार ७८९ जणांना दुसरा डोस देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ५ हजार ६२७ जणांना पहिला डोस व २ हजार ६३८ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आरोग्य सेवक व फ्रंट लाईन वर्कर मिळून ९ हजार ११६ नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा असे २१ हजार १७२ जणांना मात्रा देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत ३० हजार २४५ ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस तर १० हजार १५६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. तसेच १२ हजार ३३५ व्याधीग्रस्त नागरिकांना पहिला डोस, तर ३६४५ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

शासन निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २ मेपासून १८ ते ४४ वयोगातील व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी केंद्र निर्धारित करण्यात आले होते. यात ३ हजार ३१ जणांना कोविशिल्ड तर, १५०३ जणांना कोव्हॅक्सीन लस देण्यात आली. असे एकूण ४५३३ जणांना पहिला डोस देण्यात आला.

चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आतापर्यंत ८२ हजार ८७ जणांनी लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली. यात ६८ हजार ८६५ कोविशिल्ड, तर १३ हजार २२२ जणांनी कोव्हॅक्सीन लस घेतली.

Advertisement
Advertisement