Advertisement
नागपूर: नागपूर महानगर पालिकेत नगर सेवक असलेले मा. श्री. संजय बंगाले यांनी आज शुक्रवार, दिनांक ०४ जून रोजी नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टी म्हणून पदभार स्विकारला. नागपूर शहराचे महापौर मा. श्री. दयाशंकर तिवारी यांनी पुष्पगुच्छ देऊन संजय बंगाळे यांचे स्वागत केले.
यावेळी मा. आमदार श्री. कृष्णा खोपडे, मा. आमदार श्री. मोहन मते, मा. उपमहापौर श्रीमती मनिषा धावडे, मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रकाश भोयर तसेच इतर सन्मानीय मंडळी उपस्थित होती.