Published On : Tue, May 25th, 2021

अनिल देशमुखांना धक्का, ED ने टाकली निकटवर्तीयाच्या घरावर धाड

Advertisement

नागपूर: 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा अजूनही कायम आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आज नागपूरमधील (Nagpur) त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला आहे.

अंमलबाजवणी संचालनालय अर्थात ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात ECIR म्हणजेच एफआयआर दाखल केला. त्यानंतर आज सकाळी नागपूर मध्ये ईडीने धाड टाकली आहे. शिवाजी नगर भागात राहणाऱ्या सागर भटेवार (Sagar Bhatewar) यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे.

Gold Rate
19 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,32,000 /-
Gold 22 KT ₹ 1,14,400 /-
Silver/Kg ₹ 1,55,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सागर भटेवार Sagar bhatewar हे अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भटेवार हे अनिल देशमुख यांच्या संपर्कात होते, त्यामुळेच ईडीने भटेवार यांच्यावर घरावर छापा टाकला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीची टीम भटेवार यांची चौकशी करत आहे.

याआधी अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. आता या प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्यावर ECIR म्हणजेच एफआयआर दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात प्राथमिक तपास करून त्या तपासाच्या आधारावर ती अनिल देशमुख यांच्यावर 21 एप्रिल या दिवशी दुपारी 4 वाजता सीबीआयच्या दिल्ली येथील पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. या एफआयआरच्या अनुषंगाने सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.

सीबीआय प्राथमिक तपासात देशमुख यांच्या अनेक जवळच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले होते. याच एफआय आरच्या आधारे ED ने गुन्हा दाखल केला असून अनिल देशमुख यांच्यासह पाच अनोळखी व्यक्तींविरोधात ED ने हा एफआयआर दाखल केला होता.

सीबीआयने अनिल देशमुख 100 कोटी वसुली प्रकरणी तपास गेला होता. त्या तपासात मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच काळा पैसा परदेशात पाठवणे यासारख्या काही गोष्टी समोर आल्या होत्या, याची माहिती सीबीआयने ED ला दिली होती. याच माहितीचा अभ्यास करून प्राथमिक तपास करून ED ने अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केला. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून लवकरच देशमुख यांना या प्रकरणी चौकशी करता बोलवण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement