Advertisement
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. १९ मे) रोजी ३१ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २,२६,००० चा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत जुनी मंगलवारी येथील धिरज सावजी, सुर्यकांत सावजी आणि दानापाणी सावजी यांना गांधीबाग झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले.
तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत लोहा ओळी इतवारी मधील वासवाणी ट्रेडर्स या दुकानाला सतरंजीपूरा झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले. पथकाने ५७ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
Advertisement