Published On : Thu, Apr 22nd, 2021

केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सन 2021 महाराष्ट्रातील रस्त्यांच्या 2040 कोटींच्या 272 प्रकल्पांना ना. गडकरी यांची मंजुरी

Advertisement

विदर्भात 1028 कोटींचे 77 प्रकल्प

नागपूर: महाराष्ट्रातील 2040 कोटींच्या 272 प्रकल्पांना आज केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. विदर्भातील 1028 कोटींच्या रस्त्यांच्या 77 प्रकल्पांचा यात समावेश आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला या मंजूर कामाची यादी पाठविली असून केंद्रीय मार्ग निधी 2021 अंतर्गत ही सर्व कामे होणार आहेत.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उपराजधानी नागपूरला 12 प्रकल्प मिळाले असून या प्रकल्पांची किंमत 145.69 कोटी रुपये आहे. जिल्ह्यातील काटोल येथील रेस्ट हाऊस ते मटन मार्केट हा 1.30 किमीचा रस्ता 4.95 कोटी रुपये, कुही तालुक्यातील वाग वीरखंडी तारना येथील लहान व मोठा पूल बांधकाम 2 किमी, 11 कोटी 2 लाख, नागपुरातील कळमना उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे सव़्िर्हस रोड 2.10 किमी, 4 कोटी 95 लाख, शहरातील इनर रिंगरोडजवळ लहान पूल व भिंतीचे बांधकाम 3 कोटी 88 लाख, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 वर थातुरवाडा, बेलाभिष्णूर, तिनखेडा, खरसोली, नरखेड, मोहाडी ते मध्यप्रदेश सीमेपर्यंत 12 किमीचा रस्ता सुधारणा 3 कोटी 95 लाख, रामटेक तालुक्यातील छत्तरपूर, बोर्डा, खुमारी, भोंडेवाडा, भंडारबोडी, अरोली रस्त्यावरील लहान पुलाचे बांधकाम 4 कोटी 95 लाख, सीपीआरएफ प्रवेशद्वार लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन, रायसोनी कॉलेज, लता मंगेशकर हॉस्पिटल, शिवणगाव सीमेपर्यंत रस्त्यात सुधारणा 7 किमीसाठी 24 कोटी 79 लाख, उमरेड तालुक्यातील बेला ठाणा रस्ता 4 किमी, 24 कोटी 78 लाख, सिमेंट रस्ता नरसाळा गारगोटी ते दिघोरी नाका ते खरबी, जिजामाता नगर ते तरोडी, बिडगाव, कापसी पावनगाव, घोरपड रोड, रस्त्याचे बांधकाम 2.20 किमी, 11 कोटी 84 लाख, सिमेंट रस्ता नरसाळा गारगोटी ते दिघोरी नाका ते खरबी, जिजामाता नगर ते तरोडी, बिडगाव, कापसी पावनगाव, घोरपड रोड, रस्त्याचे बांधकाम 2.20 किमी, 13कोटी 82 लाख, मोवाड, खरसोली, जुनोना, घराड,थुगाव, निपाणी, उमरी, वाडेगाव, मोहाडी, धोत्रा, तोलापार, मोगरा रस्त्यावर खरसोली गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम 7 कोटी 2 लाख, पेंच नदीवर घाटरोहणा जुनी कामठी येथे पुलाचे बांधकाम 29 कोटी 74 लाख रुपये.

अमरावती : राष्ट्रीय महामार्ग 6 वर पिंगळाई नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम 4 कोटी 93 लाख, अमरावती बडनेरा रोडची सुधारणा 2.20 किमी, 4 कोटी 86 लाख, लहान पुलाचे बांधकाम रहीमपूर चिंचोली काळगव्हाण रस्ता 4 कोटी 93 लाख, धानोरा गुरव, नांदसावंगी पापड वाढोणा रस्त्याची सुधारणा 21 किमी, 19 कोटी 55 लाख, राष्ट्रीय महामार्ग 6, राज्यमार्ग 298 वर चांदूर बाजार वलगाव कामुंजा कुंड सारजापूर कवठा निंभोरा रस्त्याची सुधारणा 11.79 किमी, 13 कोटी 90 लाख.

अकोला : गोरेगाव माझोड आलेगाव रस्ता सुधारणा 13 किमी, 4 कोटी 93 लाख रुपये, अकोट तालुक्यात भांबेरी पार्ला, देव्हर्डा पळसोद, पानेरी मनबाडा दापुरा, पार्ला निझामपूर रस्त्याची सुधारणा आणि रुंदीकरण 5.60 किमी, 5 कोटी 82 लाख, बाळापुर तालुक्यातील8 नागद सागद हाता कारंजा, रमजानपूर, हातरुण रोडचे बांधकाम 7 किमी, 5 कोटी 92 लाख, उखळी बाजार, नेर, नांदखेड, किनखेड रस्त्याची सुधारणा आणि रुंदीकरण- 6 किमी, 6 कोटी 12 लाख, बाळापूर तालुक्यातील नागद सागद, हाता, कारंजा रमजानपूर, हातरुण रोडचे बांधकाम 7.40 किमी, 6 कोटी 32 लाख रुपये, जिल्ह्यातील डोंडवाडा ते कातीपाती रोडवर पूर्णा नदीवर पुलाचे बांधकाम 1.30 किमी, 11 कोटी 7 लाख.

भंडारा : लाखांदूर तालुक्यात सिंधपुरी लाखांदूर अर्जुनी मोरगाव सीसी रोडमध्ये सुधारणा 2.50 किमी, 4 कोटी 48 लाख, मोडाडी तालुक्यातील पांढराबोडी काटी दुसाळा रोडची दुरुती 10 किमी, 99.16 लाख, तुमसर तालुक्यात मिटेवानी ते गायमुख रोडची सुधारणा 12 किमी, 99.16 लाख, तुमसर तालुक्यातील चिंचोली लेंडेझरी रस्त्याची सुधारणा 6 किमी, 99.16 लाख, तुमसर तालुक्यात मांडवी वाहानी सिंधापुरी मोहाडी रस्त्याची दुरुस्ती 8 किमी, 99.16 लाख, भंडारा तालुक्यात कारधा खमारी रस्त्याची सुधारणा 10.30 किमी, 3 कोटी 94 लाख, पौनी तालुक्यात दिघोरी रोडवर अड्याळजवळ लहान पुलाचे बांधकाम, 18 कोटी 20 लाख.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात रस्त्यांचे 391 कोटीचे 18 प्रकल्प होणार आहेत. यात तालुका बुलडाणा, मोताळा, मेहकर, ता. लोणी, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, तालुका शेगाव, नांदुरा, जळगाव, खामगाव, मलकापूर या तालुक्यातील रस्त्यांची बांधकामे, रस्त्यांमध्ये दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

चंद्रपूर : वरोरा तालुक्यात सालोड पाडेगाव रोडवर पुलाचे बांधकाम 4 कोटी 64 लाख, कोंढापाटी, माजरी वरोरा, दहेगाव, डोंगरगाव रस्त्यावर पुलाचे पुनर्बांधकाम आणि पोचरस्त्याचे बांधकाम 4 कोटी 65 लाख, ब्रह्मपुरी तालुक्यात माळडोंगरी रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम 4 कोटी 91 लाख, राजुरा तालुक्यात राजुरा चनाखा, धानोरा अन्नूर,अंतरगाव रस्त्यावर लहान पुलाचे पुनर्बांधकाम 2 कोटी 8 लाख, मूल तालुक्यात जिल्हा सीमेजवळ जुनगाव देव्हाडा, नांदगाव, थेरगाव देव्हाडा, पोभुर्णा, घनोटी उमरी कवडजी फाटा ते किनी येनबेाडी रोड दरम्यान मोठ्या ुलाचे बांधकाम 24 कोटी 76 लाख, चिमूर जवळ 10 किमी रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण 14 केाटी 74 लाख, सिमेंट रोडचे बांधका चंद्रपूर तालुक्यातील तडाळी, साखरवाही, धुग्गुस, नकोडा, उसेगाव रोड 4 किमी, 19 कोटी 8 लाख रुपये.

गोंदिया : आमगाव तालुक्यातील गिधाडी ठाणा जावरी सितेपार काटुर्ली नवरगावकला रोडची दुरुती आणि रुंदीकरण 4 किमी 4 कोटी 96 लाख, सडक अर्जुनी तालुक्यात कोसमतोंडी, पांढरी मुरडोली रोडवर मोठ्या पुलाचे बांधकाम 3 कोटी 96 लाख, तिरोडा तालुक्यात घोग्रा मुंडीकोटा पांजरा वाडेगाव खमारी रोडचे रुंदीकरण व दुरुस्ती 27 किमी, 19 कोटी 72 लाख,

गडचिरोली : गट्टा कोठी अरेवाडा भामरागड रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम 4 कोटी 43 लाख, वडसा तालुक्यात मौसीखांब, वडाधा, वैरागड, शंकरपूर कोरेगाव ते जिल्ह्याच्या सीमेपर्यंत रस्त्याची सुधारणा आणि रुंदीकरण 7 किमी 9 कोटी 91 लाख.

वर्धा : आर्वी तालुक्यात काचनूर तळेगाव, पानवाडी रोडचे बांधकाम आणि 3 लहान पुलांचे बांधकाम 12 कोटी 88 लाख, देवळी तालुक्यात पुलगाव रेल्वे स्टेशन एमएसईबी ऑफिस रोड, रस्ता दुभाजकासह 2.50 किमी 18 कोटी 77 लाख, नांदगाव चिंचोली पारडी टेंभा रोडवर मोठ्या पुलाचे बांधकाम 34 कोटी 40 लाख, वडनेर बांबर्डा शेकापूर धानोरा रोडवर मोठ्या पुलाचे बांधाकम 4 कोटी 91 लाख, याच मार्गावर दुसर्‍या मोठ्या पुलाचे बांधकाम 9 कोटी 82 लाख रुपये.

वाशीम : रिसोड तालुक्यात सोनाटी गोंडाळा मंगरुळ झनक आणि गोवर्धन पारडी, बेलखेड रिठद रस्त्याची दुरुस्ती 7 किमी, 4 कोटी 91 लाख, शिरपूर कारंजा तामशी, वाशीम रोडची दुरुस्ती 6 किमी 5 कोटी 85 लाख, कारंजा तालुक्यातील कारंजा धनज रस्त्याची दुरुस्ती 17 किमी, 14 कोटी 73 लाख, मानोरा तालुक्यात आमगव्हाण ते भोईणी फाटा रोडची दुरुस्ती 13 किमी, 6 कोटी 88 लाख.

यवतमाळ : पुसद तालुक्यात पुसद भोजला जांब बाजार, लाखी ते जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम 4 कोटी 44 लाख, दारव्हा तालुक्यात धामणगाव, कारगाव, बंडेगाव, तळेगाव पालोडी, गणेशपूर, सेलोडी रोडचे मजबुतीकरण, रुंदीकरण व दुरुस्ती 8 किमी, 4 कोटी 77 लाख, वणी तालुक्यात चौपदरी रस्ता बांधकाम, ड्रेनेज, चिखलगाव रेल्वे प्रवेशद्वार, बस स्टँड टिळक चौक ते वरोरा रेल्वे प्रवेशद्वारपर्यंत पथदिवे, 3 किमी,24 कोटी 58 लाख, बाभुळगाव तालुक्यात मोहा मांडवी नायगाव वाटखेड रेणुकापूर रोडची दुरुस्ती 9 किमी, 9 कोटी 71 लाख, राळेगाव तालुका धानोरा सोनेगाव सावरगाव आष्टा बोरी मेंघापूर राळेगाव रस्त्याची दुरुस्ती 13.30 किमीपर्यंत, 6 कोटी 85 लाख, उमरखेड तालुक्यात पुसद गौल वसंतनगर, उमरखेड, ढाणकी कुर्ती रोडवर लहान पुलाचे बांधकाम 11 कोटी 84 लाख, यवतमाळ तालुक्यातील आजनगाव कारंजा दारव्हा यवतमाळ रोडचे बांधकाम 3.35 किमीपर्यंत, 19 कोट 67 लाख, तसेच अंतरगाव कैझरा सावली, उमरी कापेश्वर, चिखलवर्धा रोडची दुरुस्ती 22.60 किमीपर्यंत 19 कोटी 81 लाख.

याशिवाय महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रस्त्यांचे आणि पुलांचे 17 प्रक़ल्प, औरंगाबाद जिल्ह्यातील 12 प्रकल्प, बीड जिल्ह्यातील 7 प्रकल्प, धुळे जिल्ह्यात 2 प्रकल्प, हिंगोली जिल्ह्यात 3, जळगाव जिल्ह्यात रस्ते व पुलांचे 17 प्रकल्प, जालना जिल्हा 6 प्रकल्प, कोल्हापूर जिल्हा 12 प्रकल्प, लातूर जिल्हा 9 प्रकल्प, नांदेड जिल्ह्यात 12 प्रकल्प, नंदूरबार जिल्ह्यात 5 प्रकल्प, नाशिक जिल्ह्यात रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण, पुलांचे बांधकामाचे 19 प्रकल्प घेण्यात आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात 5 प्रकल्प, पालघर जिल्ह्यात 4 प्रकल्प, परभणी जिल्ह्यात 5 प्रकल्प, पुणे जिल्ह्यात 17 प्रकल्प, रायगड जिल्ह्यात 8 प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यात 7 प्रकल्प, सांगली जिल्ह्यात 10, तर सातारा जिल्ह्यात 8 प्रकल्प, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 प्रकल्प, सोलापूर जिल्ह्यात 6 प्रकल्प केंद्रीय मार्ग निधीतून घेण्यात आले आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement