Advertisement
कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लेखा नगर रहिवासी प्रसिद्ध आशा हॉस्पिटल चे प्रमुख डॉ राजेंद्र अग्रवाल हे गतरात्री 9 दरम्यान आपल्या राहत्या घरी हजर असतेवेळी आरोपीने संगनमत करून डॉ राजेंद्र अग्रवाल यांना फोन करून खंडणीची मागणी केली तसेच मागितलेली खंडणी न दिल्यास हॉस्पिटल तोडफोड करण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळ दिल्याप्रकरनी फिर्यादी डॉ अग्रवाल यांनी स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शरद गोमेकर वय 38 वर्षे रा कल्पतरू कॉलोनी कामठी तसेच मुकेश चौधरी वय 45 वर्षे रा ऑरेंज सिटी पार्क कामठी विरुद्ध भादवी कलम 294, 387, 506(ब),34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.