Advertisement
नाना पटोले यांच्या आगमनाचा नागपूर विमानतळावर एकच जल्लोष
नागपूर: काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळावर स्वागतासाठी मोठ्या संख्येने विदर्भातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते जमले आहेत. ढोल-ताशांचा गजर करीत व “आला रे आला नानाभाऊ आला” अशा घोषणा देत पटोले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. काँग्रेसतर्फे आयोजित शक्तिप्रदर्शनासाठी भंडारा, गोंदियासह विदर्भातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आज नागपुरात दाखल होत आहेत.स्वागताच्या तयारीसाठी मंगळवारी दिवसभर ब्लॉक स्तरावर बैठका झाल्या. पटोले आज दीक्षाभूमी, गणेश टेकडी व ताजबाग येथे जाऊन दर्शन घेणार आहेत.
Advertisement