नागपूर: ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत सोमवारी गडचिरोली येथे महाविकास आघाडीच्यावतीने मिशन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महाराष्ट्र विधान परिषदेत परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार करण्यात आला व पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी यांना प्रचंड मतांनी निवडणून आणण्याचे आवाहन कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, पिरिपा (कवाडे), आरपीआय (गवई गट) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी यांच्या प्रचाराला आता वेग आला असून ठिकठिकाणी बैठकांचे तसेच प्रचार सभांचे आयोजन करण्यात येत आहे. ऐन दिवाळीत चंद्रपूर, नागपूर येथे सभा झाल्यानंतर अॅड. वंजारी यांनी गडचिरोलीकडे मोर्चा वळवला.
सोमवारी भाऊबिजेच्या दिवशी गडचिरोली महाविकास आघाडीच्यावतीने निवडणूक मिशन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मंचावर कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार, माजी खासदार मारोतराव कोवासे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव रविंद्र दरेकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार हरराम वरखडे, अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, वडसाचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते बाबासाहेब भातकुलकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश ताकसांडे, शिवसेना अध्यक्ष सुखावार, नगरसेवक सतीश विधाते, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोंटू बामवाडे यांची प्रमुख उपस्थित होती.
‘पदवीधरों के सम्मान में, अभिजित वंजारी मैदान में’ असा नारा देत सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अॅड. अभिजित वंजारी यांचे मनोबल वाढवले. विजय वडेट्टीवार यांनी अॅड. वंजारी यांच्या धडाकेबाज प्रचार मोहिमेचे कौतूक केले. पदवीधर मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंद झाली असून कार्यकत् र्यांनी अॅड. वंजारी यांना प्रचंड बहुमताने जिंकून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.