Published On : Fri, Oct 9th, 2020

हाथरसच्या ‘त्या’ नराधामांना फाशी द्या – जयदीप कवाडे

Advertisement

– हाथरस घटनेच्या निषेधार्थ ‘इंसाफ आंदोलन’
– व्हेरायटी चौकात पीरिपातर्फे सरकारच्या पुतळ्याचे दहन

नागपूर: देशात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार वाढतच आहे. उत्तरप्रदेश येथील हाथरस गावात राहणाऱ्या वाल्मिकी समाजातील दलित तरुणीवर अत्याचार व निर्घृण हत्येची घटना अतीशय निदंनीय आहे. असे अवमानवीय कृत्य करणाऱ्या हाथरसच्या ‘त्या’ नराधामांना फाशी द्या अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली. व्हेरायटी चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ हाथरस घटनेच्या निषेधार्थ जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात ‘इंसाफ आंदोलनात’ करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच्या पुतळ्याचे दहन करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आले.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे बोलताना कवाडे म्हणाले की, भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उद्घोषणेला तिलांजली देण्याचे काम आज उत्तरप्रदेशात होत आहे. गावामधील उच्चवर्णीय समाजातील त्या नराधमांनी तरुणीवर अत्याचार करून तिचा हत्येचा प्रयत्न केले. पुढे प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य सुरुवातीपासून न घेतल्यानेच तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाले. मृत्यू झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांना न विचारता मध्यरात्रीला परस्पर तिचा अंत्यसंस्कार करण्याचे विकृत कृत्य उत्तरप्रदेश सरकारने केले. एकूणच घटनेतील अत्याचारांचे पाठराखन करणाऱ्या सरकारला तात्काळ बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लावण्याची खरी गरज असल्याचेही कवाडे यावेळी म्हणाले.

यावेळी आंदोलनात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, संजय मेश्राम, कैलास बोंबले, प्रकाश मेश्राम, बाळुमामा कोसमकर, कपील लिंगायत, अजय चौव्हान, अरुण वाहणे, संजय खांडेकर, दादाराव सिरसाट, भगवान भोजवानी, संजय बाडोदेकर, पलाश ठवरे, तुषार चिकाटे, प्रणय हाडके, प्रज्योत कांबळे, स्वप्नील महल्ले, रोशन तेलरांधे, विपित गाडगिलवार, मंगेश राऊत, वसीम खान, शीतल खान, निरज पराडकर, पीयूष हलमारे, अभिलाष बोरकर, महेश वद्दलमुडी, करण बोदीले, नागेश कांतगाडे, अतुल कंगाले, अनिकेत इजानकर, कुलदीप राणा, अमित उके, सोफेल वानखेडे, विशाल कडव, आकाश कारशिया, भीमराव कळमकर, निलेश बोरकर, दिनेश जिभकाटे, चेतन सोनटक्के, अनिल मेश्राम, उषा जाधव, वर्षा कारशिया, नेहा जीवने, लताताई शिंदे, रजनी ग्राशिया, कांचन तुमसरे, रजनी वासनिक, कुंदा डोंगरे, वंदना रामटेके, बुद्धेश्वर डोंगरे, अक्षय नानवटकर आदींची उपस्थिती होती.

Advertisement
Advertisement
Advertisement