Published On : Tue, Sep 22nd, 2020

अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या वाढीव पदांना

Advertisement

वेतन अनुदानासह मंजूरी देण्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा : अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील (2003 ते 2019) शिक्षकांच्या वाढीव पदांना वेतन अनुदानासह मंजूरी देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी. यासंदर्भातील उचित कार्यवाही करून अनुपालन अहवाल 15 दिवसांत सादर करावा असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज विधानभन येथे महाराष्ट्र राज्य अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची वाढीव पदे, प्रस्तावित पद कृती समितीने दिलेल्या निवेदनासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या निवेदनासंदर्भात यापूर्वीही दोन बैठका आयोजीत करून कार्यवाही सुरू करण्यात आली. राज्यातील शिक्षकांना न्याय मिळावा या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यासाठीचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.

विधानसभा अध्यक्ष पटोले म्हणाले, राज्याची भविष्यातील पिढी उत्तम घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून, शिक्षकांवर अन्याय होता कामा नये. राज्यातील जे शिक्षक अनेक वर्षे कार्यरत आहेत त्यांच्या सर्व पदांचे वेतन अनुदानासह मिळावे यासाठीची कार्यवाही पुढील 15 दिवसात होणे अत्यावश्यक आहे, असे सांगून श्री पटोले म्हणाले, या कार्यवाही संबंधातील अनुपालन अहवाल 15 दिवसांत सादर करावा.

दरवर्षी शिक्षण संचालकांनी या पदांसंदर्भातील अहवाल शालेय विभागाकडे पाठवावा व किमान कालावधीत त्यांना मंजूरी मिळावी यासाठी विभागाने कालमर्यादा आखून द्यावी असेही श्री पटोले यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस आमदार डॉ. सुधीर तांबे, बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे, माजी आमदार दत्तात्रय सावंत, शिक्षण विभागाचे अधिकारी अ.वा.बोरवणकर, विधी व न्याय विभागाचे वि.वि.जीवने आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement