सहा दिवसात २४४२ विरुध्द कारवाई
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (९ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या ६५७ नागरिकांविरुध्द कारवाई केली आणि त्यांच्याकडून १ लक्ष ३१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील सहा दिवसात शोध पथकांनी २४४२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ४,८८,४००/- चा दंड वसूल केला आहे.
नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मृतांची संख्यासुध्दा झपाटयाने वाढत चालली आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. तरीपण नागरिकांनी त्या सूचनांचे पालन न केल्यामुळे शोध पथकाचे जवानांनी कारवाई करुन दंड वसूल केला.
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ४६, धरमपेठ झोन अंतर्गत २०१, हनुमाननगर झोन अंतर्गत ६१, धंतोली झोन अंतर्गत ७३, नेहरुनगर झोन अंतर्गत ३६, गांधीबाग झोन अंतर्गत ४१, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १८, लकडगंज झोन अंतर्गत ३५, आशीनगर झोन अंतर्गत ३७, मंगळवारी झोन अंतर्गत १०१ आणि मनपा मुख्यालयात ८ जणांविरुध्द बुधवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.