Published On : Mon, Aug 31st, 2020

महावितणकडून वीज पुरवठा सुरळीत

Advertisement

नागपूर– नागपूर ग्रामीण भागात शनिवार दिनांक २९रोजी आलेल्या महापुरा नंतर खबरदारीचा उपाय म्हणून खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा महावितरकडून रविवारी दिवसभरात सुरळीत करण्यात आला. महावितरणच्या सावनेर आणि उमरेड विभागात येणाऱ्या काही गावात संध्याकाळी पुराचे पाणी ओसरले नसल्याने येथील वीज पुरवठा पूर ओसरला की सुरळीत करण्यात येईल. अशी माहिती मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.

शनिवारी सकाळ पासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात येणाऱ्या खापरखेडा, पारशिवनी,खापा,कुही,उमरेड, मौदा,येथे पुराचे पाणी वाढू लागल्याने परिसरातील वीज पुरवठा महावितरणने टप्प्याटप्याटप्याने खबरदारीचा उपाययोजना म्हणून बंद केला.महावितरणने केलेल्या या उपाय योजनेमुळे जीवहानी झाली नाही.

आज सकाळी सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे, उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे यांनी विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरुवात केली. नागपूर ग्रामीण मंडळाचे अधिक्षक अभियंता नारायण आमझरे हे सतत सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी कामठी, कन्हान, मौदा परिसरात जातीने फिरत होते. माहिती घेऊन आपल्या अधिनस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत होते.

महावितरण कडून सुरु असलेल्या कामाची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितीन राऊत यांना देण्यात आली. महावितरणने खबरदारीचा उपाययोजना म्हणून बंद केलेला वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी तात्काळ सुरू केला. याबद्दल ऊर्जामंत्री राऊत यांनी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक केले.

मौदा उपविभागात उच्चदाब वीज ग्राहकांची संख्या मोठी आहे.या वीज ग्राहकांना सध्या पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करून दिला आहे. मात्र प्रत्यक्ष मंजूर जोडभारापेक्षा कमी क्षमतेने वीज वापरण्याचे आवाहन महावितणकडून या वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.

खापा नगरपरिषदेच्या हद्यीतील बंद केलेले१३ रोहित्र दुपारी दोन वाजता तपासणी करुन सुरु केले. तसेचसाहुली,डोरली,दहेगाव,नांदोरी,नांदपूर,गडेगाव,दुधबर्डी या गावातील वीजपुरवठा सकाळी ११वाजता सुरळीत करण्यात आला. बिना संगम येथील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे दोन रोहित्र दुपारनंतर सुरू केले. वेकोलीच्या सिंगोरी येथील खाणीत पाणी असल्याने हा परिसर अजूनही अंधारात आहे.

उमरेड विभागात येणाऱ्या मोहगाव,चिचघाट,सावंगी,खरबी,हरडोली,मसळी आदी गावात गोसेखुर्द धरणातील बँक वाँटर जमा झाले होते.परिणामी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न दुपारनंतर थांबविण्यात आले.पुराचे पाणी ओसरले तर सोमवारी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.असे महावितरणने कळवले आहे.