– पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर हे खरे कोरोना योद्धा – मनसे तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांचे प्रतिपादन
रामटेक : रामटेक चे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी एक कोरोणा योद्धा म्हणून काम केलं आहे. लॉक डाऊन मधेही त्यांनी कोरोणा योद्धाची चांगली भूमिका त्यांनी निभावली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष शेखर दूंडे यांचे प्रतिपादन. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या आदेशनव्ये रामटेक चे पोलिस निरिक्षक दिलीप ठाकुर यांचे कोरोना योध्दा म्हणुन ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना रामटेक तालुका व शहर तर्फे सत्कार करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रामटेक चे तालुका अध्यक्ष शेखर दुन्डे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. ह्या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे जिल्हा सचिव मनोज गुप्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव मनोज पालिवार ,देवा महाजन ,सुरेश शुक्ला, आकाश वाडगुरे , कारमोरे , योगेश बोहरा ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक उपस्थित होते.