सावनेर- सावनेर ७४वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजारा करण्यात आला .सकाळी ७.१५ ला नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे यांच्या हस्ते झंडावंदन करण्यात आले याप्रसंगी स्वातंत्रता सेनानी व नगरवासी मोठ्या संखेत उपस्थित होते.
शहरातील सर्व निमशासकीय झंडावंदनाचे आयोजन पार पडल्यावर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मा.उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या हस्ते तहसीलदार दिपक करंडे,उपविभागिय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर ठानेदार अशोक कोळी,नगर परिषद सावनेर चे मुख्याधिकारी रवींद्र भेलावे सह सर्व शासकीय कर्मचारी व गणमान्यांच्या उपस्थितीत झंडावंदन संपन्न झाले याप्रसंगी पोलीस विभाग,होमगार्ड,एनसीसी केडेट च संदर पथसंचालन करुण राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली
तसेच शासकीय ध्वजारोहण नंतर नगरितील स्वतंत्रता संग्राम सैनिकांना शाँल श्रीफळ देऊण तर कोवीड़19 या विषाणूंच्या संसर्गातही स्थानिक तहसील प्रशासन, नगर प्रशासन,पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग तसेच पत्रकार बांधवांनी आपल्या जिवाची पर्वा न करणार्या कोरोना योध्दांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊण सन्मानित करण्यात आले .
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आपल्या संबोधनातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी अपल्या प्राणाची आहुती देणार्या सर्व स्वातंत्रता संग्राम सेनानींच्या स्मृतीस अभिवादन करुण कोवीड़ 19 या महामारीच्या काळात आपल्या व आपल्या परिवाराची काळजी न करता प्रशासनास मदत करणारे सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी, पत्रकार बांधव यांच्या अथक प्रयत्न व कर्तव्यदक्षते मुळे आज कोराना सारखा झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गजन्य महामारीवर नियंत्रण मिळवता आले.आजही या विषाणूंचा प्रादुर्भाव जाणवत आहे यावर नियंत्रण मीळवण्याकरिता आपल्याकडून असेच संघटीत स्वरुपाचे सहकार्य अपेक्षीत असुन आपण या संकटात खंबीर पणे प्रशासनाच्या सोबत उभे रहाल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला
याप्रसंगी पंचायत समीतीच्या सभापती,नायब तहसीलदार गजानन जवादे,शरद नंदुरकर,जयसिंग राठोर,संगीता बोडखे,निरक्षण अधिकारी वसुधा रघटाटे, डॉ. भगत,डॉ. भुषण सेंबेकर,डॉ. संदिप गुजर,नाझीर जयसिंग राठोड,समाज सेवी डोमासाव सावजी,दिलीप फाले,अँड् शर्मा,अश्वीन कारोकार,जाबीर शेख,बब्बू हाजी,मदन माहजन,स्वप्नील पारवे,ललितकुमार हंसराज,प्रा.कमल भारव्दाज,सादिक शेख आदी सह शेकडो गणमान्य नगरवासी प्रमुख्याने उपस्थित होते .