Published On : Mon, Aug 10th, 2020

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापना करा- मा. नाना पटोले

Advertisement

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 5 वे महाअधिवेशन वेबिनार द्वारे आयोजित करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन मा. ना. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार श्री तेजस्वी यादव, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा श्री विजय भाऊ वडेट्टीवार होते, तसेच प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रीय मागास वर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष तथा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आंध्र प्रदेश राज्याचे अध्यक्ष जस्टीस व्ही. ऐश्वर्या , मध्यप्रदेश चे आयुक्त व सचिव श्री पी.नरहरी IAS , तेलंगाना राज्याचे सचिव श्री. डॉ. आरएस प्रवीण कुमार IPS तसेच लीड इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. हरी ईपन्नापल्ली व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित होते.

महाअधिवेशनात देशातून वेगवेगळ्या राज्यातून 2500 नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते व तसेच दोन कोटी लोकांनी युट्युब फेसबुक व विविध चॅनलच्या माध्यमातून लाईव प्रसारण बघितले.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डॉक्टर बबनराव तायवाडे प्रास्ताविकातून 70 वर्षापासून ओबीसी समाजाला आतापर्यंत सत्तेत आलेल्या प्रत्येक केंद्र सरकारने संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवले आहे. सात ऑगस्ट 1990 ला मंडल आयोग व्ही.पी. सिंग यांनी लागू केला त्या निमित्त्याने दरवर्षी राष्ट्रीय ओबीसी महासंघ 7 ऑगस्टला महाअधिवेशनाचे आयोजित करीत असते कोरोना मुळे 5 वे महाअधिवेश वेबिनार द्वारे घेण्यात येत आहे ,ओबीसी समाजाच्या न्याय मागण्याचा प्रस्ताव केंद व राज्य सरकारकडे सादर करून ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या अधिवेशनातून होत असतो,असे प्रास्ताविकातून आपले मत मांडले.

अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी मा नानाभाऊ पाठवले म्हटले की राज्यात सुरू असलेली उच्च शैक्षणिक संस्था मधील भरती प्रक्रिया 100 बिंदु नामावली च्या केंद्रसरकारचा बिंदू नियमावलीनुसार करण्यात यावी, इतर मागाल प्रवर्गा सोबत मागास प्रवर्ग वर गेल्या पंचवीस वर्षापासून होत असलेल्या धोरणाचा सुत्रबद्ध प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून संविधानाने दिलेल्या अधिकाराची जपणूक केली जावी असे निर्देश दिल्याचे कबुली दिली, तसेच ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेत अशासकीय प्रस्ताव आणून केंद्र शासनाला तसा प्रस्ताव पाठविण्याची माहिती दिली तसेच केंद्रात ओबीसी मंत्रालय सुरू करण्यात यावे अशी मागणी पण नाना भाऊंनी केली.

माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशनात सहभागी केल्याबद्दल आभार मानले तसेच देशातील सर्व ओबीसी समाजाने आता एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असे म्हटले.

आरएसएस हे बहुजनांना संपविण्याचा डाव रचून संपूर्ण देशात खाजगीकरण द्वारे देशाला अधोगतिकडे घेऊन जाण्याचा मनसुबा असल्याचे सांगितले व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेहमी पाठीशी राहील अशी ग्वाही सुद्धा दिली.

मा ना श्री विजय भाऊ वडेट्टीवार इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री यांनी महा विकास आघाडी सरकार तर्फे मा श्री उद्धवजी ठाकरे यांनी ओबीसी खात्याचा भार दिल्याबद्दल आभार मानले व लवकर महाज्योती अंतर्गत ओबीसी समाजाला युपीएससी-एमपीएससी व अनेक स्पर्धा योजना व प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी एक व मुलींसाठी वेगवेगळे वस्तीगृह लवकरात लवकर सुरू होणार याची ग्वाही दिली.

राष्ट्रीय मागास वर्गाचे माजी अध्यक्ष जस्टीस व्हीं ईश्वरैया ओबीसी समाजाच्या होणाऱ्या अन्यायाबाबत प्रकाश टाकला.ओबीसीला असलेली नॉन क्रिमीलेअरची अट रद्द करण्याची मागणी केली यामुळे केंद्र सरकारमध्ये अजूनही 27% पैकी फक्त 13 % जागा भरल्या गेल्या आहेत व केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना केल्याशिवाय रोहिणी आयोग लागू न करण्याची मागणी केली, मध्यप्रदेश राज्याचे आयुक्त नरहरी यांनी आपल्या भाषणातून शैक्षणिक यावर मत टाकला त्यांनी म्हटले की जोपर्यंत ओबीसी समाज शिक्षण घेणार नाही तोपर्यंत प्रगती होणार नाही असे म्हटले. तेलंगाना राज्याचे सचिव प्रवीण कुमार आयपीएस यांनी केजी ते पीजी पर्यंतचा शैक्षणिक प्रश्नावर भर दिला.

सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणातून ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करा करण्यात यावी व केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापना करण्यात यावे व नॉन क्रिमिनल क्रिमीलेअर साठी सामाजिक न्याय विभागात ने स्थापन केलेल्या बी पी शर्मा कमिटी रद्द करण्याची मागणी केली व ओबीसी कमिटीचे चेअरमन खासदार गणेश सिंग यांनी केलेल्या शिफारशी मान्य कराव्यात अशी सर्वांनी मागणी केली मा ए के स्टालिन अध्यक्ष डीएसके पार्टी तामिळनाडू यांनी संदेश पाठवूनया अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या.

वेबिनार चे संपूर्ण व्यवस्था लीड इंडिया चे चेअरमन डॉक्टर हरी ईपन्नापली यांनी अमेरिकेच्या येथून त्यांच्या संपूर्ण टीम ने केली होती. कार्यक्रमाचे संचालनात डॉक्टर हरी ईपन्नापली यांनी केले व आभार प्रदर्शन adv रेखा बाराहाते यांनी केले अधिवेशनात यशस्वी करण्याकरिता डॉक्टर खुशालचंद्र बोपचे माजी खासदार महासचिव सचिन राजूरकर समन्वयक डॉक्टर अशोक जीवतोडे , डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष प्राध्यापक शेषराव येलेकर शरद वानखेडे , गुनेश्वर आरीकर, खेमेन्द्र कटरे रोशन कुंभलकर ,निलेश कोडे,बबनराव फंड, बबनराव वानखेडे, रुचित वाढरे, शकील पटेल, प्रा संजय पन्नासे,कल्पनाताई मानकर,ठाकरे ताई व देशातील सर्व ओबीसी संघटनेचे सहकार्य लाभले….

Advertisement
Advertisement