तरुण नगरसेवकाच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ।
रामटेक: जूनला दुपारी चार वाजता उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरिता नगरपालिका सदस्यांची विशेष सभा बोलविण्यात आली. या पदासाठी नगरसेवक आलोक मानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेला नगरसेविका शिल्पा रणदिवे,रत्नमाला अहिरकर, कविता मुलमुले,चित्रा धुरई,उजवला धमगाये,पदमा ठेंगरे,सुरेखा माकडे,वनमाला चौरागडे,नगरसेवक संजय बिसमोगरे, आलोक मानकर,प्रवीण मानापुरे,दामोदर धोपटे, विवेक तोतडे उपस्थित होते.
विशेष सभेचे कामकाज नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी दिलीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाले.सभेचे कामकाज मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांनी सांभाळले.रामटेक नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी तरुण चेहऱ्याला संधी दिल्यामुळे सर्वत्र आलोक मानकर यांचे अभिनंदन होत आहे.
आलोक मानकर हे रामटेकचे माजी नगरसेवक व नगराध्यक्ष स्वर्गीय मूलचंद मानकर यांचे पुत्र आहेत.मूलचंद मानकर यांनी अत्यन्त बिकट अवस्थेत राजकिय व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून रामटेक नगरीच्या विकासाला चालना देण्याचे महत्वाचे कार्य केले. वडिलांच्या कार्याचा वारसा घेऊन आलोक मानकर हेही राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.