Published On : Tue, Jun 2nd, 2020

सतरंजीपुरा येथील प्रतिबंधित क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा

Advertisement

स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांचे निर्देश

नागपूर: सतरंजीपुरा झोनमधील बहुतांशी भाग प्रतिबंधित असून या भागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या क्षेत्रात नागरिकांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक आहे. यासंदर्भात निर्माण झालेल्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करून सदर भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा, असे निर्देश स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पाणी समस्येबाबत स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी सोमवारी (ता.१) गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज या तिनही झोनचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या झोननिहाय बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, नगरसेविका यशश्री नंदनवार, नगरसेवक सर्वश्री प्रदीप पोहाणे, दिपराज पार्डीकर, पुरुषोत्तम हजारे, नितीन साठवणे, रमेश पुणेकर, संजय चावरे, शेषराव गोतमारे, नगरसेविका चेतना टांक, वैशाली रोहनकर, जयश्री रारोकर अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, तिनही झोनचे सहायक आयुक्त, ओसीडब्ल्यूचे अधिकारी व तिनही झोनचे डेलिगेट प्रामुख्याने उपस्थित होते.

गांधीबाग झोनमध्ये पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नसल्याबद्दल यावेळी झोनच्या संबंधित नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले. सतरंजीपुरा आणि लकडगंज झोनमध्ये नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

लकडगंज भागामध्ये बहुतांशी भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र अपु-या टँकरच्या संख्यामुळे नागरिकांना पुरेशे पाणी मिळत नाही. यावर गांभीर्याने दखल घेत स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी लकडगंज झोनमध्ये तातडीने टँकरची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले. सतरंजीपुरा झोनमध्येही पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे त्यांनी निर्देशित केले.

Advertisement
Advertisement
Advertisement