Published On : Wed, Apr 15th, 2020

संचारबंदीत सुध्दा जनावरांची कत्तल खान्यात अवैध वाहतुक सुरू

Advertisement

कन्हान : – संपुर्ण देशात, राज्यात संचार बंदी असताना सुध्दा कोदामेंढी वरून कामठी कत्तलखान्यात योध्दा पिक गाडी मध्ये अवैधरित्या नऊ जनावरे कोबुन भरून नेताना कन्हान पोलीसानी पकडुन एका आरोपीस अटक करून ५ लाख ७२ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सोम वार (दि.१३) ला सकाळी ९ वाजता दर म्यान तारसा रोड बॉयपास उडानपुला चौकात संपुर्ण देशात संचारबंदी (लॉक डाऊन) असताना सुध्दा कोदामेंढी येथुन कामठी कत्तलखान्यात योध्दा पिकअप चारचाकी गाडी क्र. एम एच ४० – बी एल- १९०२ मध्ये अवैधरित्या पाच गाय, चार गोरे असे नऊ गोधन जनावरे निर्दय पणे कोबुन भरून नेताना कन्हान पोली सानी पाठलाग करून पकडुन पाच गाय व चार गोरे किमत ७२ हजार रू व योध्दा पिकअप गाडी पाच लाख असा एकुण पाच लाख ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अब्दुल गफुर उर्फ अब्दुल करिम रा. जुनी खलाशी लाईन कामठी यास अटक केली. सायंकाळी गोरक्षण मध्ये नऊ ही जनावरे सोडुन त्याना जिवनदान दिले.

ही कार्यवाही कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार अरू़ण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात कुणाल पारधी, शरद गिते, संजय भद्रोरिया, राजेन्द्र गौतम, जितेंद्र गावंडे हयानी करून नऊ गोधन जनावरांना जिवनदान दिले.