Published On : Thu, Apr 9th, 2020

नागपुर च्या वन हेल्थ सेन्टर मधे सुरू होणार कोरोना ची चाचणी

नागपुर येथे कोरोना चाचणी साठी वन हेल्थ सेन्टर च्या दोन RT-PCR मशीन्स चे आज औपचारिक रित्या लोकार्पण झाले. यामुळे नागपुर ला कोरोना चाचणी ची क्षमता वाढेल. आज महाराष्ट्रा चे मा. दुग्ध एवं पशुपालन मंत्री सुनिलजी केदार यांच्या उपस्थितित खासदार व पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ञ डॉ विकास महात्मे यांनी या मशीन्स चे उदघाटन केले. MAFSU (Maharashtra Animals & Fisheries Sciences University) चे उपकुलगुरू डाॅ. पातुरकर ही उपस्थित होते.

गेल्यावर्षी नागपुर च्या MAFSU येथे One Health Centre सुरू करण्यासाठी डाॅ महात्मे खूप आग्रही होते आणि त्यांनी यासाठी बराच पाठपुरावा पण केला. तदनंतर मा. नितिन जी गडकरी यांचे मदतीने हे सेंटर सुरू झाले. One Health चा अर्थ आहे पशुंपासून मानवाला किंवा मानवापासून पशुंना होणा-या आजारांचे उपचार एकाच छत्राखाली करणे. वन हेल्थ सेन्टर मधे 2 PCR मशीन्स असल्याचे डाॅ महात्मेंच्या ध्यानात आले.

Gold Rate
10 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,600 /-
Gold 22 KT ₹ 1,01,900 /-
Silver/Kg ₹ 1,25,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या मशीन्स उपयोगात आणण्यासाठी त्यांची धडपड चालू होती. या मशीन्स सुरू झाल्याने नागपुर येथे कोरोना चाचणी ची क्षमता वाढेल जी येणा-या काळासाठी महत्वपूर्ण असेल.

Advertisement
Advertisement