Published On : Thu, Apr 9th, 2020

लॉकडाऊनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अल्पोपहार

Advertisement

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात अहोरात्र कर्तव्य बजावत असतानाच कायदा व सुव्यवस्थेची महत्त्वपूर्ण जबाबदारी नागपूर पोलिसांतर्फे सांभाळल्या जात आहे. शहर पोलिसांच्या सेवेचा गौरव करतानाच त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या नागपूर चॅप्टरतर्फे आज अल्पोपहार व वेकोलीतर्फे उत्पादित बाटलीबंद पाणी वाटप करण्यात आले.

पोलीस विभागाच्या विशेष शाखा (नियंत्रण कक्ष)परिसरात पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना माहिती व जनसंपर्क संचालक हेमराज बागुल, पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या (पीआरएसआय)नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष एस. पी. सिंग यांच्या हस्ते अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

Gold Rate
26 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,25,900 /-
Gold 22 KT ₹ 1,17,100 /-
Silver/Kg ₹ 1,58,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात पोलीस व आरोग्य विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. या काळात सेवा देताना प्रसंगी जीव धोक्यात सुद्धा टाकावा लागतो. अशा विपरित परिस्थितीत कार्यरत असलेल्या पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे समाजाच्या सर्व घटकांचे कर्तव्य ठरत असल्याचे यावेळी माहिती संचालक हेमराज बागुल यांनी सांगितले.

पीआरएसआयच्या नागपूर चॅप्टरतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. पोलीस विभाग चोवीस तास जनतेच्या सेवेत कार्यरत असताना त्यांच्या या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘वेकोली’तर्फे तयार करण्यात आलेल्या कोलनीर हे पाणी तसेच फळ व अल्पोपहार वितरित करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर, जिल्हा माहिती अधिकारी (विशेष कार्य) अनिल गडेकर, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी यशवंत मोहिते, एम. एम. देशमुख, डॉ. मनोजकुमार तसेच राम जेट्टी आदी विविध आस्थापनांचे जनसंपर्क अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विशेष शाखेत तसेच नियंत्रण कक्षात कार्यरत असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

Advertisement
Advertisement