Published On : Thu, Apr 2nd, 2020

कोरोना हद्दपार करण्याकरिता सेनेटाईझेशन व जनजागृती.

Advertisement

कन्हान : – कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भावावर प्रतिबंधत्मांक उपाय म्हणुन २१ दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये विविध समस्या निवारण्याकरिता स्थानिक स्वरा ज्य संस्था, सेवाभावी संस्था व समाजसे वका व्दारे एक हात मदतीचा म्हणुन नाग रिकांची होईल त्या पध्दतीने मदत आणि जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्या त येत आहे.

हिंद शक्ती संघटन कन्हान
कन्हान शहरातील मोलमजुरी करणारे, गरिब, गरजु व अपंग, निराधर लोकांना त्यांच्या घरपोच हिंद शक्ती संघटन कन्हा न चे मोहम्मद अली, बाबा खान स्वत: पोहचुन तांदुळ, दाळ धान्य सामुग्रीचे वाटप करित आहे.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


ग्राम पंचायत गोंडेगाव
गोंडेगाव ग्राम पंचायत अंतर्गत पाच ही वार्डातील हातमजुरी, शेतमजुरी करणारे मजुर, गरिब गरजु नागरिकांना सरपंच नितेश राऊत, उपसरपंच सुभाष डोकरी मारे सह ग्रा प सदस्य सुनील धुरिया, आकाश कोडवते, कुणाल मधुमटके, मोरेश्वर शिंगणे कर्मचारी संजय मेश्राम, चंदु चिंचखेडे स्वत: घरोघरी जाऊन सेनीटाईझर बॉटल वाटप करून हात स्वच्छ धुवुन सेनीटाईझशन करण्या विषयी व आपले घर व परिसर स्वच्छ ठेऊन घराच्या आत राहण्याकरिता मार्गदर्शन करित आहे. तसेच गावातील घराच्या भिंतीवर व चैकात ” महत्वाच्या कामाशिवाय बाहेर निघु नये.” असे कोरोना विषाणु हद्दपार करण्याचे अनेक श्लोगन लिहुन जनजागृती करण्यात येत आहे. तसेच गोंडेगाव वस्ती, कॉलोनी, नविन गोंडेगाव या चारही वार्डात सोडिय म हाईपोक्लोराईड फवारणी करण्यात आली आहे.


ग्राम पंचायत नांदगाव (डुमरी)
नांदगाव वस्ती, डुमरी बस स्टाप महामार्ग , डुमरी स्टेशन लोकवस्ती परिसरात ग्राम पंचायत नांदगाव व्दारे कोरोना प्रतिबंध त्माक उपाय म्हणुन सोडियम हाईपोक्लो राईड फवारणी करून परिसर सेनीटाईझ रेशन करण्यात आला. तसेच उपसरपंच सेवक ठाकरे हयानी नागरिकांना घराच्या आत राहुन शासनाच्या सुचनाचे पालन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सरपंचा सोनाली वरखडे, मनोज वरखडे, पोलीस पाटील संतेष ठाकरे, भोला खंडाते सह ग्रा प कर्मचारी उपस्थित होते.

तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी
कन्हान पासुन तीन कि मी लांब खंडाळा ग्राम पंचायत अंतर्गत कन्हान नदी काठाजवळील विजापुर परिसरात १२ते १५ झोपडया मध्ये राहणा-या विट भट्टा हात मजुरांचे काम बंद असल्याने उपास मारीची परिस्थिती ओढावत असताना तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी चे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार आपल्या सहकार्यासह पोहचुन या हातमजुराना तांदुळ व दाळ व छोटया मुलांना बिस्कीट, चॉकलेटचे वितरण करून मौलाची मदत केली. याप्रसंगी शासनाने खेडे, जंगलात व दुरवर लोकवस्तीच्या दुर राहण्या-या गरिब हात मजुरांना त्वरित अन्नधान्य पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी केली.

Advertisement
Advertisement