Published On : Thu, Jan 2nd, 2020

अमित शाह यांचे नागपुरात आगमन

Advertisement

नागपूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दुपारी २ च्या सुमारास येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक जेष्ठ नेत्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

अमित शाह थेट राजनगर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये पोहचतील. यावेळी फायर सर्व्हिस क्षेत्रातील गॅलेंट्री अवॉर्डचे वितरणही त्यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय उपस्थित राहतील.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री नव्या राष्ट्रीय फायर सर्व्हिस कॉलेजचे कॅम्पस राष्ट्राला समर्पित करतील. त्यांच्या हस्ते एनडीआरएफ अकादमीचे उद्घाटन होईल. प्रेसिडेंट्स फायर सर्व्हिस मेडलचे वितरण केले जाईल. गृहमंत्री हे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या प्रयोगशाळेला भेट देतील. एनडीआरएफ अकादमी व डीआरडीओच्या मॉडेलचे प्रदर्शन येथील यावेळी आयोजित करण्यात आले आहे. शाह हे सायंकाळी ५.५० वाजता विमानाने दिल्लीसाठी रवाना होतील.

Advertisement
Advertisement
Advertisement