Published On : Tue, Dec 31st, 2019

रामटेक येथे जिल्हा परिषदतून 13 व पंचायत समितीचे 5 असे एकूण उमेदवारांनी घेतले निवडणूक अर्ज मागे

Advertisement

.
एकूण 89 उमेदवार रिंगणात


रामटेक: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2020 च्या होऊ घातलेल्या निवडणूकित अर्ज परत घेण्याच्या दिवशी विविध उमेदवारानी आपले अर्ज परत घेऊन माघार घेतली.

वडामबा येथून हरिशकुमार मुन्नीलाल गुप्ता,खेमेन्द्रकुमार ग्यानरामजी फुलबेल,बोथिया (पालोरा)येथून प्रीतम ईश्वर वरठी, मनसर येथून सुधाकर जगन लेंडे, नगरधन येथून आम्रपाली शंकर गणवीर यानी निवडणूकीतून अर्ज परत घेऊन माघार घेतली. जिल्हा परिषदेच्या निवडणूकित वडामबा मालगुजार येथून सविता सिद्धार्थ डोंगरे,देविदास शंकर दिवटे,बाबु परसराम वरखेडे,आनंदराव नारायण वाडीवे, बोथिया पालोरा येथून लक्ष्मण उमरावजी केने,कान्द्री सोनेघाट येथून गणेश भारत राऊत,किशोर राधेलाल रहांगडाले,मनसर येथून मालती कृपासागर भोवते,विक्रांत मारोती नंदेशवर,नागरधन येथून सुनील तुकारामजी डोकरीमारे यांनी निवडणूक अर्ज मागे घेऊन माघार घेतली.

पंचायत समितीच्या निवडणूकित 5 व जिल्हा परिषदेच्या निवडणूकित 13 जण असे एकूण 18 जणांनी माघार घेतली असून जिल्हा परिषदेच्या निवडणूकित 35 आणि पंचायत समितीच्या निवडणूकित 54 उमेदवार असे एकूण 89 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली. होऊ घातलेल्या

सात जानेवारी 2020 च्या होणाऱ्या चुरशीच्या निवडणूकित नेमक्या कोणत्या उमेदवाराला पसंती देतात व निवडून आणतात हे निकालाअंती कळणार आहे.