Published On : Mon, Jun 8th, 2015

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन : प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी सचिन कुर्वे

DSC_0293Nagpur: पावसाळयात अतिवृष्टी व पुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. अशी माहिती सचिन कुर्वे यांनी आज पुर प्रतिबंधक उपाययोजना आराखडा 2015-16 तयार करण्यासंदर्भातला आढावा घेतला.  त्यावेळी ते बोलत होते.

मान्सुन 2015 पुर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आज बचत भवनात घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे व उपविभागीय अधिकारी निशिकांत सुके उपस्थित आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग व अन्न पुरवठा विभाग यांची या व्यवस्थेत मोठी भुमिका असते. त्यामुळे या खात्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहावे.

आपले भ्रमणध्वनी चोवीस तास सुरु ठेवावे असेही सचिन कुर्वे यांनी बैठकीत सांगितले. महानगरपालिका क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी उदभवलेल्या परिस्थतीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे.  सध्या महानगरपालिकेकडे असलेल्या सहा बोटींची देखभाल व दुरुस्ती करुन घ्यावी. आरोग्य विभागाने रोगराई पसरु नये यासाठी ब्लिचिंग पावडर व औषधाचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध ठेवावा.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महत्वाच्या खात्यांनी आपला नियंत्रण कक्ष सुरु करावा. व त्याचे दुरध्वनी क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियत्रंण कक्षास देण्यात यावे. असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी व पोकलॅड ही यंत्र सामग्री अद्यावत करुन ठेवावी. संपुर्ण पावसाळयात सैन्य यंत्रणेशी सतत संपर्कात राहावे. होमगार्डच्या सेवा मदतीसाठी घेण्‍यात याव्या असेही बैठकीत सांगण्यात आले.

Advertisement
Advertisement