Published On : Fri, Sep 25th, 2020

भंडारा जिल्ह्यात आज 84 रूग्णांना डिस्चार्ज

Advertisement

· 94 पॉझिटिव्ह

· पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 4507

·बरे झालेले रुग्ण 2835

· क्रियाशील रुग्ण 1576

· आज 02 मृत्यू

· एकूण मृत्यू 96

भंडारा : जिल्ह्यात आज 84 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2835 झाली असून 94 पॉझिटिव्ह रुग्णांची आज नव्याने नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4507 झाली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 28, साकोली 23, लाखांदूर 08, तुमसर 06, मोहाडी 03, पवनी 12 व लाखनी तालुक्यातील 14 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 2835 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 4507 झाली असून 1576 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 96 झाली आहे.

आज 25 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 176 व्यक्ती भरती असून 1949 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.