| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, May 13th, 2017

  ८० मुलांची रॅली चाकावरून पोचली खापरी स्टेशनवर


  नागपूर:
  कस्तुरचंद पार्क येथील #महामेट्रो च्या #माहितीकेंद्राला भेट देऊन आज ८५ मुलांची रॅली चाकावरून सिव्हिल लाईन येथील महामेट्रोच्या ऑफिसमध्ये तयार केलेल्या #खापरीस्टेशनकडे रवाना झाली. चाकावर चालणारी अडीच वर्षांपासून १५ वर्षापर्यंतची चिमुकली मुलं आणि त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना कव्हर करत, चीअर करत चालणारी पालक मंडळी… #एकमेवाद्वितीय असं हे चित्र आज सकाळी सिव्हिल लाईनच्या रस्त्यावर दृष्टीस पडलं.

  “माझी मेट्रो .. नागपूर मेट्रो .. ग्रीन मेट्रो” “हिरवे नागपूर … स्वच्छ नागपूर” असे स्केटिंग संदेश देत गांधीबाग स्केटिंग क्लबचे ८५ स्केटर्स आज सकाळी ६:०० वा. महामेट्रोच्या माहिती केंद्रातून मेट्रोबद्दलची माहिती घेऊन पुढे एल.आय.सी.चौका जवळ एकत्रितआले व तिथून स्केटिंग करीत लिबर्टी टॉकीज, वि.सि.ए. चौक, फुटाळा मार्गे सदर पोलीस स्टेशन जवळून महामेट्रोच्या कार्यालयापर्यंत पोहचले. या कार्यालयातील #खापरीस्टेशनचे मॉडेल न्याहाळत, तेथील गॅलरीचे अवलोकन केले. अतिशय शिस्तबद्ध वातावरणात ही रॅली पार पडली. या रॅलीसाठी मुलांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे स्वतः तयार केलेले स्लोगन, विविध चित्र, झेंडे आणले होते. काहींनी मेट्रोच्या कामाला समर्थन देणारे स्लोगन लिहिलेले टी-शर्ट परिधान केले होते.

  महामेट्रो या चिमुकल्या शुभचिंतकांच्या सुंदर उपक्रमाचे मनापासून कौतुक करीत आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145