Published On : Tue, May 14th, 2024
By Nagpur Today Nagpur News

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू,५९ जण जखमी

सरकारकडून मृतांच्या कुटंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर
Advertisement

घाटकोपर: मुंबईतील घाटकोपर येथे वादळ-वाऱ्यामुळे पूर्व द्रुगती मार्गावरील पेट्रोल पंपावर मोठे लोखंडी होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच आतापर्यंत ६७ जणांना बाहेर काढण्यात आले असून अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारद्वारे आर्थिक मदत देणार असल्याची माहिती दिली.

Gold Rate
Sept 16,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,400 /-
Gold 22 KT ₹ 1,41,400 /-
Silver/Kg ₹ 2,33,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असून या घटनेत ज्यांच्या मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री साहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

ही घटना अतिशय दुर्देवी असून घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याठिकाणी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. तसेच बचावकार्य सुरू आहे.या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.